PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

प्रविष्टि तिथि: 16 MAY 2021 9:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 16 मे 2021

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

भारतात आज कोविडमुक्त झालेल्यांची एकूण संख्या 2,07,95,335 वर पोहोचली आहे. रूग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 84.25% इतका आहे.

गेल्या 24 तासात 3,62,437  रूग्ण कोविडमुक्त झाल्याची नोंद झाली. ही संख्या मागील 6 दिवसांत सलग पाचव्या वेळी  24 तासांमध्ये, दैनंदिन नोंद होणाऱ्या  नवीन कोविड रूग्णांपेक्षा अधिक आहे.

कोविडमुक्त होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 70.94% दहा राज्यांमधील आहेत.

दुसऱ्या आघाडीवर, भारतातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या आज 36,18,458 पर्यंत कमी झाली आहे.  आता देशातील एकूण सक्रीय रुग्णांचे प्रमाण 14.66% आहे.

गेल्या 24  तासांत सक्रीय रूग्णसंख्येत 55,3444 ची घट झाली आहे.

भारतातील एकूण सक्रिय रूग्णांपैकी 74.69% रूग्ण 10 राज्यांत  आहेत.

पॉझिटिव्हिटी रेटमध्ये ही घसरण दिसून आली असून 16.98% वर आला आहे.

देशभरातील  लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्य्याअंतर्गत देशभरात राबविल्या जाणाऱ्या कोविड -19 लसींच्या  मात्रांच्या  एकूण संख्येने आज 18 कोटी 22 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार एकूण 18,22,20,164 लसींच्या मात्रा  26,55,003 सत्रांद्वारे देण्यात आल्या आहेत. यामध्ये 96,42,278 एचसीडब्ल्यू, ज्यांनी पहिली मात्रा घेतली आहे , 66,41,047 एचसीडब्ल्यू आहेत ज्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली आहे, 1,44,25,044 एफएलडब्ल्यू (1 ली मात्रा), 81,86,568 एफएलडब्ल्यू (2 री मात्रा ), 18-44 वयोगटातील 48,25,799 लाभार्थी आहेत (1 ली मात्रा ) तर 45 ते 60 वर्षे वयोगटातील , 5,71,61,076  (1 ली मात्रा ) 45 ते 60 वर्षे   वयोगटातील 90,66,862  (2 री मात्रा)) 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 5,44,69,599( पहिली  मात्रा) लाभार्थी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 1,78,01,891 (दुसरी मात्रा)  घेतलेल्या लाभार्थीचा समावेश आहे.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण लसींच्या मात्रांपैकी 66.76% मात्रा दहा राज्यांत देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 18 - 44 वयोगटातील 5 ,62,130 लाभार्थ्यांना लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याच्या सुरूवातीलाच कोव्हीड लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. 32 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण, 48,25,799 लसींच्या मात्रा एकत्रितपणे देण्यात आल्या.

गेल्या 24  तासांत 17  लाखाहून अधिक लसींचे डोस देण्यात आले. लसीकरण मोहिमेच्या (15 मे,2021) - 120 व्या दिवशी 17 ,33,233 लसींच्या मात्रा  देण्यात आल्या . एकूण 16,027 सत्रांमधून अनुक्रमे, 11,30,928. लाभार्थ्यांचे प्रथम मात्रेसाठी लसीकरण करण्यात आले आणि 6,02,304 लाभार्थ्यांना त्यांच्या लसीची दुसरी मात्रा  मिळाली.

तारीख: 15 वा मे, 2021 (दिवस -120)

गेल्या 24 तासांत 3,11,170 नवीन रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांतल्या एकूण रुग्णांपैकी  74.7% रुग्ण दहा राज्यांमधील आहेत.

कर्नाटकमध्ये  सर्वाधिक  दैनंदिन नवीन रुणांची 41,664  नोंद झाली आहे. त्याखालोखाल महाराष्ट्रात 34,848 नवीन रुणांची नोंद झाली असून तामिळनाडूमध्ये, 33,658 इतके नवीन रुग्ण आढळले आहेत.

कोविडचा राष्ट्रीय मृत्यूदर सध्या 1.09 % आहे.

गेल्या 24 तासांत 4,077 मृत्यूची नोंद झाली.

नवीन मृत्यूंपैकी 75.55% वाटा दहा राज्यांचा आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले (960),त्या खालेखाल कर्नाटकमध्ये दैनंदिन 349 मृत्यू झाले.

याव्यतिरिक्त, कोविड -19 चा मुकाबला करण्यासाठी परदेशातून येत असलेल्या  मदत साहित्यांचे जलदगतीने  विभाजन करत,ती  राज्य /केंद्रशासित प्रदेशांना पाठविली जात आहे. यातून एकूण, 10,953 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स,,13,169 ऑक्सिजन सिलिंडर्स,19 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, 6,835 व्हेंटिलेटर/BI पीएपी; 4.9 लाख रेमडेसव्हीरच्या कुप्या आतापर्यंत रस्ते आणि हवाई मार्गे वितरीत/रवाना केल्या आहेत.

इतर अपडेट्स :

महाराष्ट्र अपडेट्स :-

महाराष्ट्रातील म्युकरमायकोसिस या आजाराचे वाढते प्रमाण बघता, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाला सरकारी तसेच खाजगी रुग्णालयात या आजाराच्या रुग्णांवरील उपचारासाठी विशिष्ट स्वतंत्र वार्ड तयार करण्यास सांगितले आहेत. तसेच या आजाराच्या रुग्णांवर उपचारासाठी तज्ञ आणि 22 परिचारिकांचे स्वतंत्र पथक तयार करावे असे सांगितले आहे.  शनिवारी महाराष्ट्रात कोविड बाधितांची संख्या ही 46 दिवसांमधील सर्वात कमी संख्या होती. मात्र,  शनिवारी राज्यात 960 मृत्यूंची नोंद झाली, जी आतापर्यंतच्या दैनंदिन मृत्यूसंख्येत दुसऱ्या क्रमांकाची मृत्यूसंख्या आहे. आतापर्यंत  कोविडने राज्यात 80,512 जण दगावले आहेत. राज्यात 34,848 नवीन कोविड-19 बाधितांची नोंद झाली आहे व गेल्या चोवीस तासात 960 जण दगावले आहेत.

गोवा अपडेट्‌स:-

गोव्यातील कोविड-19 वर उपचार देणाऱ्या 21 खाजगी रुग्णालयातील प्रवेश 17 मे पासून राज्य शासनाकडून नियंत्रित केले जातील असे गोवा सरकारने जाहीर केले आहे.या रुग्णालयातील उपचारांचा खर्च राज्य सरकार करेल. तसेच यातील प्रत्येक रुग्णालयात शासकीय अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल असेही सरकारने स्पष्ट केले आहे. हे अधिकारी या रुग्णालयांमधील 50 खाटा कोविड रुग्णांसाठी राखून ठेवल्या जातील याची खातरजमा केली जाईल. राज्य सरकारने शनिवारी बांबोलिम येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 20,000 लीटर क्षमतेचा वैद्यकीय वापरासाठीचा द्रवरुप ऑक्सिजनची साठवण टाकी बसवली.

 

R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1719205) आगंतुक पटल : 263
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Punjabi , Gujarati