रेल्वे मंत्रालय

ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून देशभरात 9440 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा


आतापर्यंत 150 ऑक्सिजन एक्सप्रेसने आपला प्रवास केला पूर्ण

55 टँकर्ससह 970 मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजन 12 ऑक्सिजन एक्सप्रेसचा प्रवास सध्या सुरु

ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून 13 राज्यांत ऑक्सिजनची मदत पोचली, महाराष्ट्रात 521 मेट्रिक ऑक्सिजनचा पुरवठा

Posted On: 16 MAY 2021 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2021

 

सर्व अडथळ्यांवर मात करत आणि अडचणींवर तोडगा शोधत, भारतीय रेल्वेने देशभरातल्या विविध राज्यात द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा आपला प्रवास सुरूच ठेवला आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेने  विविध राज्यात, 590 टँकर्समधून 9440 मेट्रिक टन ऑक्सिजन पोचवला आहे.

आतापर्यंत 150 ऑक्सिजन एक्सप्रेसनी ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आपला प्रवास पूर्ण करत विविध राज्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे.

हे वृत्त तयार होईपर्यंत, 55 टँकर्ससह 970 मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजन 12 ऑक्सिजन एक्सप्रेसचा प्रवास सध्या सुरु होता.

केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यांकडे ऑक्सिजन एक्सप्रेस पोचत असून, ऑक्सिजन गरजूंपर्यंत पोचवण्याचे काम अहोरात्र सुरु आहे.

तसेच NCR परिसरात, आतापर्यंत 5000 मेट्रिक टन ऑक्सिजन पोचवण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून 800 मेट्रिक टन ऑक्सिजन दररोज देशाच्या विविध भागात पोचवला जातो आहे.

गरजू राज्यांना त्यांच्या विनंतीनुसार अधिकाधिक ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरु आहेत.

केरळसाठीची पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस 118 मेट्रिक टन ऑक्सिजन घेऊन एर्नाकुलमला पोचली आहे.

आतापर्यंत, 521 मेट्रिक टन ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात पोचला असून, 2525 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्तरप्रदेशात, 430 मेट्रिक टन ऑक्सिजन मध्यप्रदेश, 200 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्तराखंडला, 118 मेट्रिक टन ऑक्सिजन केरळला, 151 मेट्रिक टन ऑक्सिजन तामिळनाडू, 116 मेट्रिक टन ऑक्सिजन आंध्रप्रदेश तर 3320 मेट्रिक टन ऑक्सिजनपेक्षा जास्त ऑक्सिजन दिल्लीला पोचवण्यात आला आहे.

ऑक्सिजन एक्सप्रेस चालवणे ही गतिमान प्रक्रिया असून त्याच आकडे सातत्याने बदलत असतात. आज रात्री आणखी काही ऑक्सिजन एक्सप्रेस आपला प्रवास सुरु करण्याची अपेक्षा आहे.

रेल्वेने ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी विविध ठिकाणांचे मार्ग आणि पुरवठा स्थाने निश्चित केली असून राज्यांच्या ऑक्सिजनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्ण सज्जता ठेवली आहे. द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन आणण्यासाठी राज्यांकडून रेल्वेला टँकर्स दिले जात आहेत. 

 

R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1719185) Visitor Counter : 224