आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

मागील 6 दिवसांतल्या आकडेवारीत, पाच वेळा 24 तासांत दैनंदिन नोंद होणाऱ्या नवीन कोविड रूग्णांपेक्षा कोविडमुक्त झालेल्या रूग्णांची संख्या अधिक


गेल्या 24 तासांत सक्रीय रूग्णसंख्येत 55,344 ची घट

भारतातीत एकूण लसीकरण 18 कोटी 22 लाखांपेक्षा जास्त

आतापर्यंत 18 -44 वयोगटातील 48 लाखाहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण

Posted On: 16 MAY 2021 3:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2021

 

भारतात आज कोविडमुक्त झालेल्यांची एकूण संख्या 2,07,95,335 वर पोहोचली आहे. रूग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 84.25% इतका आहे.

गेल्या 24 तासात 3,62,437  रूग्ण कोविडमुक्त झाल्याची नोंद झाली. ही संख्या मागील 6 दिवसांत सलग पाचव्या वेळी  24 तासांमध्ये, दैनंदिन नोंद होणाऱ्या  नवीन कोविड रूग्णांपेक्षा अधिक आहे.

कोविडमुक्त होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 70.94% दहा राज्यांमधील आहेत.

दुसऱ्या आघाडीवर, भारतातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या आज 36,18,458 पर्यंत कमी झाली आहे.  आता देशातील एकूण सक्रीय  रुग्णांचे प्रमाण 14.66% आहे.

गेल्या 24  तासांत सक्रीय रूग्णसंख्येत 55,3444  ची घट झाली आहे.

भारतातील एकूण सक्रिय रूग्णांपैकी 74.69% रूग्ण 10 राज्यांत  आहेत.

खालील आलेख गेल्या 24 तासांमधील विविध राज्यांमधील सक्रिय रूणांमधील बदल दर्शवित आहे.

पॉझिटिव्हिटी रेटमध्ये ही घसरण  दिसून आली  आहे आणि तो  खाली दर्शविल्याप्रमाणे आता 16.98% वर आला आहे.

देशभरातील  लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्य्याअंतर्गत देशभरात राबविल्या जाणाऱ्या  कोविड -19 लसींच्या  मात्रांच्या  एकूण संख्येने आज 18 कोटी 22 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 18,22,20,164. लसींच्या मात्रा    26,55,003 सत्रांद्वारे देण्यात आल्या आहेत. यामध्ये 96,42,278 एचसीडब्ल्यू, ज्यांनी पहिली मात्रा  घेतली आहे , 66,41,047 एचसीडब्ल्यू आहेत ज्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली आहे, 1,44,25,044 एफएलडब्ल्यू (1 ली मात्रा), 81,86,568 एफएलडब्ल्यू (2 री मात्रा ), 18-44 वयोगटातील 48,25,799 लाभार्थी आहेत (1 ली मात्रा ) तर 45 ते 60 वर्षे वयोगटातील , 5,71,61,076  (1 ली मात्रा ) 45 ते 60 वर्षे   वयोगटातील 90,66,862  (2 री मात्रा)) 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 5,44,69,599( पहिली  मात्रा) लाभार्थी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 1,78,01,891 (दुसरी मात्रा)  घेतलेल्या लाभार्थीचा समावेश आहे.

HCWs

1st Dose

96,42,278

2nd Dose

66,41,047

FLWs

1st Dose

1,44,25,044

2nd Dose

81,86,568

Age Group 18-44 years

1st Dose

48,25,799

Age Group 45 to 60 years

1st Dose

5,71,61,076

2nd Dose

90,66,862

Over 60 years

1st Dose

5,44,69,599

2nd Dose

1,78,01,891

 

Total

18,22,20,164

 

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण लसींच्या मात्रांपैकी 66.76% मात्रा या दहा राज्यांत देण्यात आल्या.

गेल्या 24 तासांत 18 - 44 वयोगटातील 5 ,62,130 लाभार्थ्यांना लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याच्या सुरूवातीलाच कोव्हीड लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. 32 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण, 48,25,799 लसींच्या मात्रा एकत्रितपणे देण्यात आल्या. खालील तक्त्यात आतापर्यंत 18--44 वर्षे वयोगटातील नागरीकांना दिलेल्या एकत्रित लसींच्या मात्रांचा आलेख  दर्शविला गेला आहे.

S. No.

States

Total

1

A & N Islands

1,181

2

Andhra Pradesh

3,443

3

Assam

1,96,690

4

Bihar

6,23,255

5

Chandigarh

1,938

6

Chhattisgarh

1,028

7

Dadra & Nagar Haveli

2,992

8

Daman & Diu

3,137

9

Delhi

5,78,140

10

Goa

5,800

11

Gujarat

4,82,501

12

Haryana

4,20,625

13

Himachal Pradesh

14

14

Jammu & Kashmir

31,188

15

Jharkhand

73,436

16

Karnataka

1,13,335

17

Kerala

1,553

18

Ladakh

570

19

Madhya Pradesh

1,81,722

20

Maharashtra

6,48,674

21

Meghalaya

3,884

22

Nagaland

4

23

Odisha

1,39,177

24

Puducherry

2

25

Punjab

6,961

26

Rajasthan

7,17,784

27

Tamil Nadu

31,356

28

Telangana

500

29

Tripura

2

30

Uttar Pradesh

4,14,736

31

Uttarakhand

1,08,125

32

West Bengal

32,046

Total

48,25,799

 

गेल्या 24  तासांत 17  लाखाहून अधिक लसींचे डोस देण्यात आले. लसीकरण मोहिमेच्या (15 मे,2021) - 120 व्या दिवशी 17 ,33,233 लसींच्या मात्रा  देण्यात आल्या . एकूण 16,027 सत्रांमधून अनुक्रमे, 11,30,928. लाभार्थ्यांचे प्रथम मात्रेसाठी लसीकरण करण्यात आले आणि 6,02,304 लाभार्थ्यांना त्यांच्या लसीची दुसरी मात्रा  मिळाली.

तारीख: 15 वा मे, 2021 (दिवस -120)

HCWs

1stDose

14,093

2ndDose

18,622

FLWs

1stDose

56,699

2nd Dose

35,560

18-44 years

1st Dose

5,62,130

45 to 60 years

1stDose

3,48,678

2nd Dose

3,05,017

Over 60 years

1stDose

1,49,328

2nd Dose

2,43,105

Total Achievement

1stDose

11,30,928

2ndDose

6,02,304

 

गेल्या 24 तासांत 3,11,170 नवीन रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांतल्या एकूण रुग्णांपैकी  74.7% रुग्ण दहा राज्यांमधील आहेत.

कर्नाटकमध्ये  सर्वाधिक  दैनंदिन नवीन रुणांची 41,664  नोंद झाली आहे. त्याखालोखाल महाराष्ट्रात 34,848 नवीन रुणांची नोंद झाली असून तामिळनाडूमध्ये, 33,658 इतके नवीन रुग्ण आढळले आहेत.

राष्ट्रीय मृत्यु दर सध्या 1.09 % आहे.

गेल्या 24 तासांत 4,077 मृत्यूची नोंद झाली.

नवीन मृत्यूंपैकी 75.55% वाटा दहा राज्यांचा आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले (960),त्या खालेखाल कर्नाटकमध्ये दैनंदिन 349 मृत्यू झाले.

याव्यतिरिक्त, कोविड -19 चा मुकाबला करण्यासाठी परदेशातून येत असलेल्या  मदत साहित्यांचे जलदगतीने  विभाजन करत,ती  राज्य / केंद्रशासित प्रदेशांना पाठविली जात आहे. यातून एकूण, 10,953 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स,,13,169 ऑक्सिजन सिलिंडर्स,19 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, 6,835 व्हेंटिलेटर /  BI पीएपी; 4.9 लाख रेमडेसव्हीरच्या कुप्या आतापर्यंत रस्ता आणि हवाई मार्गे वितरीत / रवाना केल्या आहेत.

 

 

R.Aghor/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1719092) Visitor Counter : 174