आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड मदतकार्य अद्ययावत माहिती
कोविडच्या विरोधात भारताच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी जागतिक पातळीवरून मिळत असलेली मदत तत्परतेने राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांकडे रवाना
आतापर्यंत 11,000 प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर्स, 13,500 ऑक्सिजन सिलेंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती प्लांट्स , 7,500 हून जास्त व्हेंटीलेटर्स/ Bi PAP, सुमारे 5.3 L रेमडेसिविर वायल्स वितरित/ रवाना केल्या गेल्या
Posted On:
16 MAY 2021 5:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मे 2021
सद्भावना आणि भारतातील संकटसमयी एकात्मतेच्या भावनेतून अभूतपूर्व कोविड लाटेशी सामना करण्याच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी भारत सरकारला जागतिक पातळीवरून सहकार्य मिळत आहे. विविध देश आणि संस्थांकडून 27 एप्रिल 2021 पासून आंतरराष्ट्रीय देणग्या व कोविड-19 वरील उपचारांसाठी वैद्यकीय साधनसामग्री प्राप्त होत आहे. भारत सरकार या साधनसामग्रीचे राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्याकडील संसाधने व प्रयत्नांना बळ देण्यासाठी त्वरीत वितरण करत आहेत.
27 एप्रिल 2021 ते 15 मे 2021 पर्यंत एकूण 11,058 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 13,496 ऑक्सिजन सिलेंडर्स; 19 ऑक्सिजन निर्मिती प्लांट्स; 7,365 व्हेंटीलेटर्स /Bi PAP; जवळपास 5.3 लाख रेमडेसिविर वायल्स, रस्ते तसेच हवाई मार्गाने वितरीत किंवा रवाना केल्या गेल्या.
14 व 15 मे 2021 रोजी कझाकस्तान, जपान, स्वित्झर्लंड, ओन्तारियो (कॅनडा), अमेरिका, इजिप्त व ब्रिटीश ऑक्सिजन कंपनी (युके) यांच्याकडून आलेल्या मुख्य सामग्रीत खालील गोष्टींचा समावेश होता.
- ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स: 100
- व्हेंटीलेटर्स/Bi PAP CPAP: 500
- ऑक्सिजन सिलेंडर्स: 300
- रेमडेसिविर: 40,000
- मास्क आणि संरक्षण संच
ही मदत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आली.
राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना तसेच संस्थांना मदतीचे त्वरीत वाटप आणि यथायोग्य वितरणाचे काम सातत्याने सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय सातत्याने यावर देखरेख ठेवून आहे. देणग्या, मदत आणि अनुदान या स्वरूपात येणाऱ्या कोविड उपचारांसाठीच्या बाहेरून आलेल्या सामग्रीचे वितरण आणि वाटपातील समन्वय राखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत एक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष 26 एप्रिल 2021 पासून कार्यरत आहे. 2 मे 2021 पासून आरोग्य मंत्रालयाने प्रमाणित कार्यान्वयन पद्धती (SOP) तयार करून अंमलात आणली आहे.
R.Aghor/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1719128)
Visitor Counter : 182