रसायन आणि खते मंत्रालय

देशभरातील रेमडेसिवीरची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी दिनांक 23 मे 2021 पर्यंतचे रेमडेसिवीरचे वितरण - डी.व्ही. सदानंद गौडा


देशभरातील बदलत्या गरजांनुसार रेमडेसिवीर वितरणातही बदल

प्रविष्टि तिथि: 16 MAY 2021 6:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2021

 

प्रत्येक राज्यातील रेमडेसव्हिरची आवश्यकता लक्षात घेऊन आणि त्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय रसायन आणि  खते मंत्री श्री. डी.व्ही.सदानंद गौडा यांनी दिनांक 23 मे 2021 पर्यंतचा रेमडेसिवीरचे वितरण जाहीर केले आहे. रेमडेसिवीरचे  एकूण उत्पादन आणि वितरण  यात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.

औषधनिर्माण विभाग आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्यांना लिहिलेल्या पत्रानुसार, याआधी 21 एप्रिल ते 16 मे या काळासाठी करण्यात आलेल्या रेमडेसीवीर वितरणाच्या नियोजनात, राज्यांच्या बदललेल्या गरजांनुसार बदल करण्यात आला आहे.  

हे वाटप राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील सरकारांना करण्यात आले आहे आणि सरकारी आणि खाजगी रुग्णालयांतून  त्याचे योग्य आणि न्याय्य वाटप करण्यासाठी, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना, त्या अनुषंगाने वितरणावर देखरेख ठेवण्यास सांगितले आहे.

राज्य सरकारांना/केंद्रशासित प्रदेशांना असा सल्ला देण्यात आला आहे, की त्यांनी विपणन कंपन्यांकडे पुरेशा खरेदीबाबत त्वरित ऑर्डर द्यावी, जर त्यांनी तसे केले नसेल तर ते पुरवठा साखळीनुसार राज्य / केंद्रशासित प्रदेशांना वाटपातून जितक्या प्रमाणात वाटप करावयाचे आहेत त्यासाठी कंपन्यांच्या संपर्क अधिकाऱ्यांशी समन्वय साधून ही खरेदी करावयास लागेल. राज्यातील खासगी वितरकांशी देखील संपर्क साधता येऊ शकेल.

 

 

R.Aghor/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1719164) आगंतुक पटल : 290
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , Odia , English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Tamil , Telugu , Kannada