आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारत सरकारकडून आत्तापर्यंत राज्य / केंद्र शासित प्रदेशांना 20 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा मोफत देण्यात आल्या आहेत


राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही 1.84 कोटी पेक्षा अधिक मात्रा उपलब्ध

याव्यतिरिक्त जवळपास 51 लाख लसींच्या मात्रा पुढील तीन दिवसांत राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना प्राप्त होतील

Posted On: 16 MAY 2021 3:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2021

 

 

लसीकरण हा भारत सरकारच्या  महामारीच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या (चाचणी, ट्रॅक, उपचार आणि कोविड योग्य वर्तणूक यांचा  समावेश असलेल्या )  व्यापक एकात्मिक  रणनीतीचा एक अविभाज्य  महत्वपूर्ण घटक आहे. भारत सरकार ,विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड लस मोफत देऊन देशव्यापी लसीकरण मोहिमेत योगदान देत आहे, तसेच त्याचे उत्पादन आणि  पुरवठा वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करीत आहे.

कोविड -19 लसीकरणाच्या उदार आणि गतीशील टप्प्यातील रणनीतीची अंमलबजावणी दिनांक 1 मे 2021 पासून  सुरू झाली आहे. या धोरणाच्या अंतर्गत प्रत्येक महिन्यात केंद्रीय औषध  प्रयोगशाळेने (CDL)    मान्यता दिलेल्या, एकूण उत्पादकांच्या लसींपैकी 50% मात्रा  सरकारकडून खरेदी केल्या जातील. पूर्वी निश्चित केल्यानुसार राज्य सरकारांना या मात्रा पूर्णपणे मोफत उपलब्ध करुन दिल्या जातील.

भारत सरकारने आतापर्यंत राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य (20,28,09,250) 20 कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा  प्रदान केल्या आहेत. यापैकी 14 मे 2021 पर्यंतच्या वाया गेलेल्या लसींसह एकूण  मात्रांपैकी सरासरी 18,43,67,772 मात्रा (काल सायंकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या  उपलब्ध आकडेवारीनुसार) दिल्या गेल्या आहेत.

1.84 कोटीहून अधिक कोविड लसींच्या मात्रा  (1,84,,41,478) अद्याप राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत. मात्रांची उणे संख्या  दर्शविणाऱ्या  राज्यांतील लसींच्या मात्रा, सशस्त्र दलांने पुरविलेल्या लसींच्या मात्रांशी जुळत  नसल्यामुळे पुरविल्या जाणाऱ्या  लसींच्या मात्रांपेक्षा जास्त वापर झालेला (अपव्यय समाविष्ट) दर्शवित आहेत.

याव्यतिरिक्त, जवळपास 51 लाख (50,95,640) लसींच्या मात्रा वितरीत करणे  प्रस्तावित असून पुढील  3 दिवसांत त्या  राज्य / केंद्रशासित प्रदेशांना प्राप्त होतील.

एचएफडब्ल्यू / कोविड लस राज्यांना / 16  मे 2021/22 रोजी प्राप्त

M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1719089) Visitor Counter : 206