PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
15 MAY 2021 8:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 15 मे 2021
- India’s Cumulative Vaccination Coverage exceeds 18 Crore
- PM chairs a high-level meeting on Covid and vaccination related situation
- AIIMS doctors provide guidance on Medication and Care for Mild COVID-19 Patients
- Government Supports Augmentation of Manufacturing Capacity for COVAXIN production under Mission COVID Suraksha
- Oxygen Expresses deliver more than 8700 MT of Liquid Medical Oxygen to the Nation
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
PRESS INFORMATION BUREAU
MINISTRY OF INFORMATION AND BROADCASTING
GOVERNMENT OF INDIA
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
देशातील लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात आतापर्यंत एकूण 18 कोटींहून जास्त नागरिकांनी कोविड -19 प्रतिबंधक लस घेतली आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीच्या अंतरिम अहवालानुसार, देशात एकूण 26,02,435 सत्रांच्या आयोजनाच्या माध्यमातून कोविड लसीच्या 18,04,57,579 मात्रा दिल्या गेल्या आहेत. यामध्ये लसीची पहिली मात्रा घेतलेले 96,27,650 आरोग्य सेवा कर्मचारी तर लसीची दुसरी मात्रा घेतलेले 66,22,040 आरोग्य सेवा कर्मचारी, 1,43,65,871 पहिल्या फळीतील कर्मचारी (पहिली मात्रा), 81,49,613 पहिल्या फळीतील कर्मचारी (दुसरी मात्रा), 18 ते 45 वर्षे वयोगटातील 42,58,756 (पहिली मात्रा), 45 ते 60 वर्षे या वयोगटातील 5,68,05,772 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 87,56,313 लाभार्थी (दुसरी मात्रा) 60 वर्षांहून जास्त वयाचे 5,43,17,646 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 1,75,53,918 लाभार्थी (दुसरी मात्रा) तसेच यांचा समावेश आहे.
आतापर्यंत दिल्या गेलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांपैकी 66.73% मात्रा देशातील दहा राज्यांमध्ये दिल्या गेल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 18 ते 44 वर्षे वयोगटातील 3,28,216 लाभार्थ्यांनी कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतली आहे आणि लसीकरण मोहिमेच्या सध्या सुरु असलेल्या तिसऱ्या टप्प्यात आतापर्यंत 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील एकूण 42,58,756 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
गेल्या 24 तासांत कोविड प्रतिबंधक लसीच्या 11 लाखांहून जास्त मात्रा देण्यात आल्या. लसीकरण मोहिमेच्या 119 व्या दिवशी, (14 मे 2021 रोजी) कोविड प्रतिबंधक लसीच्या 11,03,625 मात्रा देण्यात आल्या. एकूण 11,628 लसीकरण सत्रांच्या आयोजनाच्या माध्यमातून 6,29,445 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा तर 4,74,180 लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.
भारतात कोविडमधून बरे झालेल्यांची एकूण संख्या आज 2,04,32,898 पर्यंत पोहोचली आहे तर राष्ट्रीय रोगमुक्ती दर 83.83% आहे.
गेल्या 24 तासांत 3,53,299 रुग्ण कोविडमधून बरे झाले अशी नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसात चौथ्यांदा भारतातील रोगमुक्तांची संख्या दैनंदिन कोविड बाधितांपेक्षा जास्त आढळून आली आहे.
कोविड आजारातून नव्याने बरे झालेल्या एकूण रुग्णांपैकी 70.49% रुग्ण देशाच्या 10 राज्यांमधील आहेत.
इतर अपडेटस्
- केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या उत्कृष्ठता केंद्राकडून (सेंटर ऑफ एक्सलन्स) कोविड पॉझिटीव्ह रुग्णांसाठी “गृह विलगीकरणातील औषधे आणि घ्यावयाची काळजी” या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. एम्स दिल्ली येथील डॉ मनीष, डॉ नीरज निश्चल यांनी या वेबिनारमध्ये तज्ञ म्हणून मार्गदर्शन केले.डॉ. मनीष यांनी 'सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी उपचारासंदर्भातील सुधारित मार्गदर्शक सूचना' तर 'गृह विलगिकरणातील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी औषधांचे व्यवस्थापन' यासंदर्भात डॉ. नीरज यांनी मार्गदर्शन केले.
- “संपूर्णतः सरकार” दृष्टीकोनाच्या माध्यमातून कोविड-19 संसर्गाशी लढण्यासाठी घेतलेल्या आघाडीत भारताला जगभरातील विविध देश तसेच संस्थांकडून 27 एप्रिल 2021 पासून कोविड -19 संसर्गात होत असलेल्या अभूतपूर्व अशा तीव्र वाढीशी सामना करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सहाय्यक ठरणाऱ्या वैद्यकीय सामानाच्या तसेच साधनांच्या स्वरुपात आंतरराष्ट्रीय देणग्या आणि मदत प्राप्त होत आहे. सुव्यस्थित आणि पद्धतशीर यंत्रणेच्या माध्यमातून, केंद्र सरकारची विविध मंत्रालये तसेच विभाग संयुक्त सहकार्याने, देशात आलेल्या जागतिक मदत सामग्रीचे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अखंडितपणे वितरण करीत आहेत. आतापर्यंत एकूण 10,953 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 13,169 ऑक्सिजन सिलेंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे, 6,835 व्हेन्टिलेटर्स/बीआय पीएपी यंत्रे, रेमडेसिवीर औषधाच्या 4.9 लाख कुप्यांचे रस्ते तसेच हवाई वाहतुकीच्या माध्यमातून वितरण झाले आहे किंवा वितरणासाठी हे सामान रवाना होत आहे.
- देशातील कोविड आणि लसीकरण संबंधित परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. देशातील कोविडशी संबंधित सद्यस्थितीबाबत अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. देशात चाचण्याचे प्रमाण वेगाने वाढत असून मार्च महिन्याच्या सुरूवातीला दर आठवड्याला सुमारे 50 लाख चाचण्या केल्या जायच्या, आता हे प्रमाण आठवड्याला 1.3 कोटी चाचण्या इतके झाले आहे अशी माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. चाचणी सकारात्मकतेचे प्रमाण हळूहळू कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे पंतप्रधानांना सांगण्यात आले. दररोज 4 लाखांच्या संख्येने नवे रुग्ण आढळत होते, मात्र आरोग्यसेवा कर्मचारी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे आता त्यात घट झाली आहे याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
- ऑक्सिजन सिलेंडर आयात करण्यासाठी जागतिक उत्पादकांना मंजुरी देण्याच्या पेट्रोलियम अँड एक्स्प्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायजेशन( पेसो) च्या सध्या अस्तित्वात असलेल्या प्रक्रियेचा भारत सरकारने आढावा घेतला आहे. कोविड महामारीचा विचार करता, अशा प्रकारची मंजुरी देण्यापूर्वी जागतिक उत्पादकांच्या उत्पादन केंद्रांची पेसोकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार नाही. आता अशा प्रकारची मंजुरी उत्पादकांकडून आयएसओ प्रमाणपत्र, सिलेंडरच्या वैशिष्ट्यांच्या माहितीसह यादी, ड्रॉईंग आणि बॅच क्रमांक, हायड्रो टेस्ट प्रमाणपत्र आणि थर्ड पार्टी इन्स्पेक्शन आदी तपशील सादर केल्यानंतर कोणत्याही विलंबाविना ऑनलाईन देण्यात येईल. ज्या परदेशी उत्पादकाला/आयातदाराला ऑक्सिजन सिलेंडरची आयात करायची असेल त्याने आयातीसाठी पेसो ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून परवानगी घेतली पाहिजे.
- सर्व अडचणींवर मात करत आणि नवे पर्याय शोधत भारतीय रेल्वे देशभरातील राज्यांना द्रवरूप प्राणवायूच्या पुरवठ्याची मदत पोचवत आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेने देशभरातील विविध राज्यांना जवळपास 8700 मेट्रीक टन द्रवरुप प्राणवायू 540 पेक्षा जास्त टँकर्स मधून वितरीत केला आहे. नोंदवण्याजोगी बाब अशी की आतापर्यंत 139 ऑक्सिजन एक्स्प्रेसनी विविध राज्यांना मदत पोचवण्यासाठी प्रवास केला आहे.
- एका मुंबईस्थित स्टार्ट-अपने प्रत्येकी 100 रुपयांत कोविड-19 निदान तसेच संशय दूर करण्यासाठी किफायतशीर रॅपिड अँटिजेन चाचणी किट तयार केले आहे. हे किट पतंजली फार्मा या कंपनीने विकसित केले असून ते प्रमाणित RTPCR आणि रॅपिड अँटिजेन चाचणीला पूरक असेल आणि सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व चाचणी किट पैकी सर्वात किफायतशीर दर असलेले असेल.
- आत्मनिर्भर भारत 3.0 अभियानांतर्गत स्वदेशी कोविड प्रतिबंधक लसींचा विकास व उत्पादनाची गती वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून मिशन कोविड सुरक्षा योजना जाहीर करण्यात आली. नवी दिल्ली येथे जैव तंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषद (बीआयआरएसी) येथे केंद्र सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाकडून याची अंमलबजावणी केली जात आहे. या मिशन अंतर्गत कोव्हॅक्सिनच्या स्वदेशी उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी एप्रिल 2021 मध्ये केंद्र सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाने लसीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी लस उत्पादक सुविधांना अनुदान म्हणून आर्थिक सहाय्य दिले. सप्टेंबर, 2021 पर्यंत उत्पादन क्षमता दरमहा 10 कोटीपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.
- पुण्यातील एएफएमसी अर्थात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातून 55व्या( सी3) तुकडीच्या 21 महिला कॅडेट्ससह 110 वैद्यकीय कॅडेट्सना सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवांमध्ये( एएफएमएस) वैद्यकीय अधिकारी म्हणून 15 मे 2021 रोजी रुजू करून घेण्यात आले. मात्र, एएफएमसीच्या वैद्यकीय कॅडेट्सना सेवेत रुजू करून घेण्यासाठी होणारे दीक्षांत संचलन पहिल्यांदाच सध्याच्या कोविड-19 विषयक निर्बंधांमुळे रद्द करावे लागले. लेफ्टनंट जनरल नरदीप नैथानी, पीव्हीएसएम, कमांडट एएफएमसी यांच्या हस्ते एका छोटेखानी परंतु सुनियोजित कार्यक्रमात वैद्यकीय कॅडेट्सना सेवेत रुजू करून घेण्यात आले. 94 कॅडेट्सना लष्कराच्या, 10 कॅडेट्सना भारतीय हवाई दलात आणि 6 कॅडेट्सना भारतीय नौदलात नियुक्त( कमिशन्ड) करण्यात आले.
- ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ ही भारतातील सर्वात मोठी एकात्मिक उर्जा कंपनी असून या मंडळाने गंभीर कोविड रुग्णांना सहाय्य करण्यासाठी, विविध राज्यांत 500 पेक्षा जास्त ऑक्सिजन सहाय्य असलेल्या खाटा आणि विलगीकरणाची सुविधा असलेल्या, 1100 पेक्षा जास्त खाटा उपलब्ध केल्या आहेत. एनसीआर भागातील, बदरपुर, नोएडा आणि दादरी येथे कंपनीने ऑक्सिजनची सोय असलेले 200 बेड आणि 140 विलगीकरण बेडची सुविधा असलेली कोविड आरोग्य केंद्रे सुरू केली आहेत. याव्यतिरिक्त ओदिशातील सुंदरगड येथे 500 खाटांचे कोविड आरोग्य केंद्र सुरू केले आहे, जेथे 20 व्हेंटिलेटर पुरविण्यात आले आहेत.
- सध्या कोरोना विषाणूमुळे आलेल्या महामारीच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशावर झालेला परिणाम आणि वैद्यकीय सुविधांमध्ये तसेच घरात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी वाढती ऑक्सिजनची मागणी लक्षात घेऊन केंद्रीय उर्जा मंत्रालयाने राज्यांमधील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना अहोरात्र अखंडितपणे वीज पुरवठा होईल याची सुनिश्चिती करून घेण्यासाठी अनेक सक्रीय प्रतिबंधात्मक आणि उपकारक उपाययोजना हाती घेतल्या आहेत उर्जा मंत्रालयाने परिचालन परीक्षणासाठी देशभरातील प्रमुख 73 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प निश्चित केले आहेत यापैकी 13 प्रकल्प राष्ट्रीय राजधानी क्षेत्र विभागात ऑक्सिजनचा पुरवठा करतात.
- देशातील काही राज्यांमध्ये, अॅम्फोटेरिसिन बी या औषधाच्या मागणीत अचानक वाढ दिसून आली आहे, जे औषध म्हणून डॉक्टरांद्वारे रुग्णांना कोविडपश्चात म्युकरमायकोसीस या गुंतागुंतिच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना, घेण्यास सूचित केले जात आहे. या कारणास्तव, भारत सरकार या औषध उत्पादकांसोबत त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी बोलणी करीत आहे. या औषधाची अतिरिक्त आयात करून तसेच स्थानिक उत्पादनात वाढ करत पुरवठ्याच्या स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. उत्पादक / आयातदार यांच्याकडे असलेल्या शिल्लक साठ्याच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि 11 मे 2021 रोजी औषध विभागातील अॅम्फोटेरिसिन बी या औषधाच्या मागणीचा पाहिल्यानंतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे औषध वाटप अपेक्षित पुरवठ्यानुसार दिनांक 10 मे ते 31 मे, 2021 पर्यंत उपलब्ध केले जाईल. सरकारी, खाजगी रुग्णालये आणि आरोग्य सेवा संस्थांमधून समान प्रमाणात पुरवठ्याचे वितरण करण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्याची विनंती राज्यांना करण्यात आली आहे. या वाटपातील औषध मिळविण्यासाठी खाजगी आणि शासकीय रुग्णालयांतून संपर्क रुग्णांच्या सोयीसाठी सार्वजनिकपणे जाहीर करण्याचे आदेश राज्यांना देण्यात आले आहेत. याव्यतिरीक्त राज्यांना अशी विनंती करण्यात आली आहे, की यापूर्वी पुरवठा केला गेलेला साठा आणि उपलब्ध असलेला साठा यांचा काटेकोरपणे वापर करावा. राष्ट्रीय औषध मूल्यांकन प्राधिकरण (नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइसिंग अथॉरिटी ,एनपीपीए) यांच्याद्वारे पुरवठ्याच्या व्यवस्थेचे परीक्षण केले जाईल.
PIB FACTCHECK
Scammers impersonate official government websites, URLs and letters to fraud people!
If you come across any similar images, documents & letters that you think are #FAKE
Then send your fact check requests to
📱+918799711259
📧 socialmedia@pib.gov.in pic.twitter.com/VxE2gEWXT0
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 15, 2021
***
Jaydevi PS/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1718929)
Visitor Counter : 240