वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
वैद्यकीय ऑक्सिजनची साठवणूक आणि वाहतूक करण्यासाठी आयात सिलेंडर आणि प्रेशर व्हेसल्सना जलदगतीने मंजुरी देण्यासाठी गॅस सिलेंडर नियम 2016 मधील तरतुदी शिथिल
Posted On:
15 MAY 2021 8:26PM by PIB Mumbai
ऑक्सिजन सिलेंडर आयात करण्यासाठी जागतिक उत्पादकांना मंजुरी देण्याच्या पेट्रोलियम अँड एक्स्प्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायजेशन( पेसो) च्या सध्या अस्तित्वात असलेल्या प्रक्रियेचा भारत सरकारने आढावा घेतला आहे. कोविड महामारीचा विचार करता, अशा प्रकारची मंजुरी देण्यापूर्वी जागतिक उत्पादकांच्या उत्पादन केंद्रांची पेसोकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार नाही. आता अशा प्रकारची मंजुरी उत्पादकांकडून आयएसओ प्रमाणपत्र, सिलेंडरच्या वैशिष्ट्यांच्या माहितीसह यादी, ड्रॉईंग आणि बॅच क्रमांक, हायड्रो टेस्ट प्रमाणपत्र आणि थर्ड पार्टी इन्स्पेक्शन आदी तपशील सादर केल्यानंतर कोणत्याही विलंबाविना ऑनलाईन देण्यात येईल. ज्या परदेशी उत्पादकाला/आयातदाराला ऑक्सिजन सिलेंडरची आयात करायची असेल त्याने आयातीसाठी पेसो ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून परवानगी घेतली पाहिजे.
सध्याची आकस्मिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रक्रिया शिथिल केल्या आहेत आणि आकस्मिक कारणांमुळे आणि टाळता न येण्याजोग्या स्थितीमुळे आयातीसाठी पेसोची परवानगी न घेता भारतात आधीच दाखल झालेल्या ऑक्सिजन सिलेंडरच्या खेपा, आयएसओ कंटेनर किंवा पीएसए प्लांट किंवा संबंधित उपकरणे आदींसाठी खालील प्रक्रियेचा अवलंब करण्याची गरज आहे. हे सिलेंडर भरण्यासाठी शिथिल केलेल्या खालील नियमांनुसार परवानगी देण्यात येईल. जर ऑनलाईन परवानगी घेतली नसेल तर यापुढे आयात केल्या जाणाऱ्या अशा उपकरणांसाठी याच प्रक्रियेचा अवलंब केला जाईल.
अशा वेळी सामग्री पाठवण्यापूर्वी पेसोचे प्रमाणीकरण अनिवार्य असणार नाही. मात्र, ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करण्यापूर्वी त्याचे वजन आणि हायड्रो टेस्टींग यासाठी पेसोचे प्रमाणीकरण आवश्यक असेल. मात्र, परदेशातील भारतीय मिशनने ही सामग्री परदेशातून रवाना करण्यापूर्वी ऑक्सिजन सिलेंडर भारतात वापरण्यासाठी किंवा ते आंतरराष्ट्रीय मानकानुसार योग्य आहेत की नाहीत याची खातरजमा करावी. जर सिलेंडर आधीपासूनच भरलेले असतील तर ते निर्यात करणाऱ्या संस्थेने या सिलेंडरमध्ये भरलेला ऑक्सिजन आवश्यक त्या शुद्धतेचा आणि संपृक्ततेचा असल्याचे आणि तो वैद्यकीय वापरासाठी योग्य असल्याचे प्रमाणित करावे. त्याचबरोबर ते भारतात दाखल झाल्यावर अशा भरलेल्या सिलेंडरची पेसोच्या पॅनेलवर असलेल्या तज्ञांकडून नमुना चाचणी स्वरुपात तपासणी करण्यात येईल आणि ते वैद्यकीय वापरासाठी योग्य असल्याचे प्रमाणित करण्यात येईल.
भरलेल्या सर्व सिलेंडरमधील वायूच्या गुणवत्तेची वैद्यकीय/ अन्न आणि औषध नियंत्रक यांच्या देखरेखीखाली पडताळणी करण्यात येईल आणि वैदयकीय ऑक्सिजनच्या दर्जानुसार या वायूचा दर्जा असल्याची पुष्टी झाल्यावर ते थेट रुग्णालयांकडे पाठवण्यात येतील. हे सिलेंडर रिकामे झाल्यावर पुन्हा ते भरणाऱ्या केंद्राकडे पाठवले जातील आणि वर दिलेल्या प्रक्रियेचा पुन्हा अवलंब करण्यात येईल.
वायूभरणा सुविधा असलेल्या रुग्णालयातील पीएसए प्रकल्पांसाठी किंवा कोविड केंद्रांसाठी मार्गदर्शक नियमः
ज्या पीएसए प्रकल्पांमध्ये उत्पादित ऑक्सिजन थेट रुग्णालयांना पुरवला जातो/ सिलेंडर भरण्याची प्रक्रिया होत नाही, त्यांना पेसोकडून हाताळल्या जाणाऱ्या नियमांतर्गत परवानगी किंवा परवान्याची गरज नाही आणि त्यांना अनुमती देता येईल.
जर पीएसएला कॉम्प्रेसर जोडलेला असेल आणि ऑक्सिजन सिलेंडर भरला जाणार असेल तर रुग्णालयाने पेसोला खालील माहितीसह ते कळवणे गरजेचे आहे.
भरणा होणाऱ्या स्थानांची संख्या
त्या जागी साठा केल्या जाणाऱ्या सिलेंडरची संख्या
पाईपलाईनकडून कॉम्प्रेसरला जाणाऱ्या बाह्यमार्गाला एसआरव्ही जोडलेला असणे अनिवार्य आहे.
ती जागा हवेशीर आणि पुरेशी प्रकाशमान असावी
सिलेंडर भरण्यापूर्वी त्याची तपासणी करण्यात यावी/ त्यामध्ये कार्बनयुक्त ग्रीस नसल्याची खातरजमा करण्यासाठी स्वच्छता करण्यात यावी आणि वैध हायड्रो चाचणी प्रमाणपत्र असावे( सिलेंडरची 225 Kg/Cm2 ला हायड्रोस्टॅटिकली चाचणी झाली आहे)
सिलेंडर भरण्याची प्रक्रिया सक्षम आणि अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात यावी.
सिलेंडर भरण्याची जागा वेगळी करण्यात यावी आणि सर्व बाजूंनी भरणा करण्याच्या जागेपासून एक मीटरचे अंतर राखले जावे.
एखाद्या कोविड सेंटरला प्रत्यक्ष जागी लिक्विड सिलेंडरचा वापर वेपरायजरसह करून वायूरुप वैद्यकीय ऑक्सिजन पाईपवाटे पुरवण्यासाठी किंवा खुल्या जागेमध्ये सिलेंडर भरण्यासाठी करता येऊ शकेल मात्र वर दिलेल्या पीसए प्रकल्पांच्या नियमांमधील ब नियमांतर्गत असलेल्या निकषांची पूर्तता करावी लागेल आणि त्याची माहिती पेसोला द्यावी लागेल.
शिथिल केलेले हे नियम सहा महिने कालावधीसाठी किंवा उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडून पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे आधी असेल तोपर्यंत लागू राहातील.
***
Jaydevi PS/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1718917)
Visitor Counter : 396