विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

विज्ञान, तंत्रज्ञान विभागाचा पाठींबा असलेल्या स्टार्ट-अपने विकसित केला  ग्रामीण तसेच मर्यादित साधने असलेल्या भागांमध्ये कोविड-19 च्या जलद निदानासाठी किफायतशीर चाचणी किट

Posted On: 15 MAY 2021 7:48PM by PIB Mumbai

 

एका मुंबईस्थित स्टार्ट-अपने प्रत्येकी 100 रुपयांत कोविड-19 निदान तसेच संशय दूर करण्यासाठी किफायतशीर रॅपिड अँटिजेन चाचणी किट तयार केले आहे.

हे किट पतंजली फार्मा या कंपनीने विकसित केले असून ते प्रमाणित RTPCR आणि रॅपिड अँटिजेन चाचणीला पूरक असेल आणि  सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व चाचणी किट पैकी सर्वात किफायतशीर दर असलेले असेल.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने सुरु केलेल्या कोविड-19 आजाराशी सुरु असलेल्या युद्धात सहाय्य करण्यासाठीचे केंद्र (कवच) नामक उपक्रमाच्या अंतर्गत जुलै 2020 मध्ये रॅपिड कोविड-19 निदान (कोविड-19 संसर्गाचा संशय दूर करण्यासाठी आणि जलद निदानासाठी अनुक्रमे रॅपिड अँटिबॉडी आणि अँटिजेन) चाचणी किट विकसित करण्यासाठी पाठबळ दिले आहे.

पतंजली फार्मा कंपनीचे संचालक डॉ.विनय सैनी यांनी, आयआयटी मुंबई येथे या स्टार्ट-अपचे काम सुरु करून 8 ते 9 महिन्यात संशोधन आणि विकसन प्रयोगशाळेची उभारणी केली तसेच उत्पादनांची निर्मिती केली. ही उत्पादने तपासण्यासाठी आणि त्यांच्या दर्जात आणखी सुधारणा करण्यासाठी विविध कोविड केंद्रांवर पाठवून त्यांचे परीक्षण तसेच प्रमाणीकरण करण्यात आले आणि आवश्यक परवानग्या देण्यात आल्या.

कोविड रुग्णांच्या नाकातील आणि घशातील स्त्रावांचे नमुने असलेल्या विषाणू वाहक माध्यमात आणि रुग्णांसाठी आमची उत्पादने वापरून प्रमाणीकरण करण्याचा अनुभव अत्यंत आश्चर्यकारक होता. माझ्या पथकातील सहकाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मुंबईत विविध कोविड केंद्रांवर आम्ही विकसित केलेल्या उत्पादनांच्या अनेक मूल्यांकनाच्या वेळी मी उपस्थित राहिलो, असे या उत्पादनांच्या विकासाच्या प्रवासाचे वर्णन करताना डॉ सैनी यांनी सांगितले.

जून 2021 च्या सुरवातीला या रॅपिड कोविड-19 अँटिजेन चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन स्टार्टअपने केले आहे. सुमारे 10 ते 15 मिनिटांत होणारी ही चाचणी पॅथॉलॉजी तसेच चाचणी प्रयोगशाळांची कमतरता असलेला ग्रामीण भाग, डॉक्टरांचे दवाखाने तसेच मर्यादित साधने असलेल्या भागांमध्ये कोविड निदानासाठी उपयुक्त ठरणार आहे. ही चाचणी किफायतशीर दारात होणार असून त्यामुळे महामारीला आळा घालण्यासाठी मदत होणार आहे.

सध्या ते DST SEED अनुदान आणि BRICS देश, CRISPR आधारित कोविड-19 चाचणी   अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठाच्या IUSSTF अंतर्गत  कोविड-19 प्रेरक अनुदान, भारत-अमेरिका प्रकल्प यांच्या माध्यमातून रॅपिड कोविड-19 अँटिबॉडी चाचणी तसेच रॅपिड टीबी चाचणी यांच्यावर काम करीत आहेत.

अधिक माहितीसाठी डॉ.विनय सैनी, संचालक, पतंजली फार्मा (www.patanjalipharma.com ,91- 9987253095), यांच्याशी संपर्क साधावा.

  

 

***

Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1718894) Visitor Counter : 224


Read this release in: English , Hindi , Bengali , Telugu