रेल्वे मंत्रालय

ऑक्सिजन एक्स्प्रेसकडून देशभरात  8700 मेट्रीक टनाहून जास्त द्रवरुप ऑक्सिजन वितरीत


आतापर्यंत 139 ऑक्सिजन एक्स्प्रेसनी केला आहे प्रवास

Posted On: 15 MAY 2021 7:45PM by PIB Mumbai

 

सर्व अडचणींवर मात करत आणि नवे पर्याय शोधत भारतीय रेल्वे देशभरातील राज्यांना द्रवरूप प्राणवायूच्या पुरवठ्याची मदत पोचवत आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेने देशभरातील विविध राज्यांना जवळपास 8700 मेट्रीक टन द्रवरुप प्राणवायू 540 पेक्षा जास्त टँकर्स मधून वितरीत केला आहे.

नोंदवण्याजोगी बाब अशी की आतापर्यंत 139  ऑक्सिजन एक्स्प्रेसनी  विविध राज्यांना मदत पोचवण्यासाठी प्रवास केला आहे.

हे वृत्त  प्रसिद्ध होईपर्यंत 35 टँकर्समधून 475 मेट्रीक टन द्रवरूप प्राणवायू घेऊन 6 ऑक्सिजन एक्स्प्रेस धावत आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये दर दिवशी  ऑक्सिजन एक्स्प्रेस देशाला जवळपास 800 मेट्रीक टन प्राणवायू पोचवत आहे.

आंध्रप्रदेशासाठी पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस नेल्लोर येथे 40 मेट्रीक टन द्रवरूप प्राणवायू घेऊन पोचली.

अजून एक ऑक्सिजन एक्स्प्रेस केरळच्या दिशेने त्या भागासाठी  118 मेट्रीक टन द्रवरूप प्राणवायू घेऊन प्रवास करत आहे.

हे वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत महाराष्ट्रात 521 मेट्रीक टन, उत्तरप्रदेशात जवळपास 2350 मेट्रीक टन, मध्यप्रदेशात 430 मेट्रीक टन, हरयाणात 1228 मेट्रीक टन, तेलंगणात 308 मेट्रीक टन, राजस्थानात 40 मेट्रीक टन, कर्नाटकात 361 मेट्रीक टन, उत्तराखंडात 200 मेट्रीक टन, तामिळनाडूत 111 मेट्रीक टन, आंध्र प्रदेशात 40 मेट्रीक टन तर दिल्लीत 3084 मेट्रीक टनाहून अधिक प्राणवायू उतरवण्यात आला आहे.

***

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1718892) Visitor Counter : 225