आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड मदतीबाबत अद्ययावत माहिती


कोविड-19 आजाराशी लढण्यासाठी परदेशातून येणाऱ्या मदत सामग्रीला तातडीने सीमा शुल्क मंजुरी देऊन त्याचे योग्य विभाजन करून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठविण्याची प्रक्रिया सुरु

आतापर्यंत सुमारे 11,000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 13,000 पेक्षा अधिक ऑक्सिजन सिलेंडर्स, 19  ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे, 6,800 हून अधिक व्हेन्टिलेटर्स/बीआय पीएपी यंत्रे, रेमडेसिवीर औषधाच्या 4.9 लाख कुप्या हे सामान वितरणासाठी रवाना झाले आहे किंवा त्याचे वितरण पूर्ण झाले आहे

Posted On: 15 MAY 2021 5:41PM by PIB Mumbai

 

संपूर्णतः सरकार दृष्टीकोनाच्या माध्यमातून कोविड-19 संसर्गाशी लढण्यासाठी घेतलेल्या आघाडीत भारताला जगभरातील विविध देश तसेच संस्थांकडून 27 एप्रिल 2021 पासून कोविड -19 संसर्गात होत असलेल्या अभूतपूर्व अशा तीव्र वाढीशी सामना करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सहाय्यक ठरणाऱ्या वैद्यकीय सामानाच्या तसेच साधनांच्या स्वरुपात आंतरराष्ट्रीय देणग्या आणि मदत प्राप्त होत आहे. सुव्यस्थित आणि पद्धतशीर यंत्रणेच्या माध्यमातून, केंद्र सरकारची विविध मंत्रालये तसेच विभाग संयुक्त सहकार्याने, देशात आलेल्या जागतिक मदत सामग्रीचे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अखंडितपणे वितरण करीत आहेत.

आतापर्यंत एकूण 10,953 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 13,169 ऑक्सिजन सिलेंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे, 6,835 व्हेन्टिलेटर्स/बीआय पीएपी यंत्रे, रेमडेसिवीर औषधाच्या 4.9 लाख कुप्यांचे रस्ते तसेच हवाई वाहतुकीच्या माध्यमातून वितरण झाले आहे किंवा वितरणासाठी हे सामान रवाना होत आहे.

अमेरिका, इटली, कॅनडा, दक्षिण कोरिया, ओमान, ब्रिटीश ऑक्सिजन कंपनी (युके), कोहारू 3SP(जपान)तसेच गिलेड(अमेरिका) या देशांकडून 13 आणि 14 मे 2021 रोजी प्राप्त झालेली मुख्य सामग्री

रेमडेसीवीर : 68,810

टोसिलिझुमॅब: 1,000

व्हेन्टिलेटर्स/बीआय पीएपी/सीपीएपी: 338

ऑक्सिजन सिलेंडर्स: 900

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स: 157

परदेशातून जागतिक मदतीच्या स्वरुपात आलेल्या सामानाचे परिणामकारकरित्या त्वरित वितरण आणि प्राप्तकर्त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याचा सुव्यवस्थित पुरवठा करण्याची प्रक्रिया सतत सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय सर्वसमावेशकतेने आणि नियमितपणे या प्रक्रियेचे निरीक्षण करीत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत एका समर्पित समन्वय गटाची स्थापना करण्यात आली असून हा गट परदेशातून आलेल्या कोविड -19 मदत सामग्रीचे अनुदान, मदत आणि देणगी स्वरुपात ग्रहण आणि वितरण करण्याचे काम करीत आहे. हा गट 26 एप्रिल 2021 पासून कार्यान्वित करण्यात आला. आरोग्य मंत्रालयाने या गटासाठीची प्रमाणित कार्यान्वयन प्रक्रिया निश्चित करून 2 मे 2021 पासून लागू केली आहे.

 

फोटो 1. युकेहून प्राप्त झालेले ऑक्सिजन सिलेंडर्स गुजरात साठी रवाना केले जात असताना

***

S.Tupe/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1718827) Visitor Counter : 169