पंतप्रधान कार्यालय
पीएम - किसान योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा 8 वा हप्ता पंतप्रधान 14 मे रोजी जारी करणार
प्रविष्टि तिथि:
13 MAY 2021 2:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मे 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम - किसान ) योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा 8 वा हप्ता जारी करणार आहेत. यामुळे 19,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी 9.5 कोटीहून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांना हस्तातंरित केला जाईल. पंतप्रधान या कार्यक्रमादरम्यान शेतकरी लाभार्थ्यांशी संवाद साधतील. यावेळी केंद्रीय कृषिमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
पीएम - किसान संदर्भात :
पीएम-किसन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6000 रुपये याप्रमाणे प्रत्येकी 2000 रुपयांचे तीन समान हप्ते चार महिन्यांच्या कालावधीनंतर प्रदान केले जातात . हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जातो. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.15 लाख कोटी रुपयांचा सन्मान निधी शेतकरी कुटुंबांना हस्तांतरित करण्यात आला आहे.
Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1718276)
आगंतुक पटल : 320
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam