रसायन आणि खते मंत्रालय

सरकारने म्युकरमायकोसीस या आजाराच्या विरोधात लढण्यासाठी अ‍ॅम्फोटेरिसिन- बी- या रसायनाची उपलब्धता वाढवण्यासाठी उचलली पावले

Posted On: 12 MAY 2021 2:51PM by PIB Mumbai

 

देशातील काही राज्यांमध्येअ‍ॅम्फोटेरिसिन बी या औषधाच्या मागणीत अचानक वाढ दिसून आली आहे, जे औषध म्हणून डॉक्टरांद्वारे रुग्णांना कोविडपश्चात म्युकरमायकोसीस या  गुंतागुंतिच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना,घेण्यास सूचित केले जात आहे.या कारणास्तव, भारत सरकार या औषध उत्पादकांसोबत त्याचे उत्पादन  वाढवण्यासाठी  बोलणी करीत आहे. या औषधाची अतिरिक्त आयात करून तसेच स्थानिक उत्पादनात वाढ करत  पुरवठ्याच्या स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

उत्पादक / आयातदार यांच्याकडे असलेल्या शिल्लक साठ्याच्या  स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि 11 मे 2021 रोजी औषध  विभागातील अ‍ॅम्फोटेरिसिन बी  या औषधाच्या मागणीचा  पाहिल्यानंतर  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे औषध वाटप अपेक्षित पुरवठ्यानुसार दिनांक 10 मे ते 31 मे, 2021 पर्यंत उपलब्ध केले जाईल. सरकारीखाजगी रुग्णालये आणि आरोग्य सेवा संस्थांमधून समान प्रमाणात पुरवठ्याचे वितरण करण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्याची विनंती राज्यांना करण्यात आली आहे. यावाटपातील औषध मिळविण्यासाठी खाजगी आणि  शासकीय रुग्णालयांतून  संपर्क  रुग्णांच्या सोयीसाठी सार्वजनिकपणे जाहीर  करण्याचे आदेश  राज्यांना देण्यात आले आहेत.याव्यतिरीक्त  राज्यांना अशी  विनंती करण्यात आली आहे, की यापूर्वी पुरवठा केला गेलेला साठा आणि उपलब्ध असलेला  साठा यांचा काटेकोरपणे वापर करावा. राष्ट्रीय औषध मूल्यांकन प्राधिकरण (नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइसिंग अथॉरिटी ,एनपीपीए) यांच्याद्वारे पुरवठ्याच्या व्यवस्थेचे परीक्षण केले जाईल.

संपूर्ण देश महामारीच्या तीव्र लाटेतून  जात आहे आणि त्याचा परिणाम देशाच्या विविध भागांवर  झाला आहे. भारत सरकार, आवश्यक अशा कोविड औषधांच्या  पुरवठ्यात वाढ करण्यासाठी तसेच तो, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना न्याय्य आणि  पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करुन देण्याच्या  कार्यासाठी अविरतपणे झटत आहे.

***

Jaydevi PS/S.Patoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1717921) Visitor Counter : 211