PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
10 MAY 2021 9:10PM by PIB Mumbai
- India Fastest globally to Administer 17 cr vaccine doses
- Nearly 18 crore vaccine doses provided to States/UTs Free of Cost by Govt. of India, so far
- Through a “Whole of Government” approach, Govt of India has expeditiously Delivered Global Aid to States/UTs
- 8900 Oxygen Concentrators; 5043 Oxygen Cylinders; 18 Oxygen Generation Plants; 5698 ventilators/Bi PAP; about 3.4L Remdesivir vials delivered/ dispatched so far
- Oxygen availability increased through higher production and imports, setting up of PSA Plants, and Procurement of Oxygen Concentrators
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
नवी दिल्ली/मुंबई, 10 मे 2021
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
6,738 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स, 3,856 ऑक्सिजन सिलिंडर्स, 16 ऑक्सिजन निर्मिती प्लांट्स, 4,668 व्हेंटिलेटर / बीआय पीएपी / सी पीएपी आणि 3 लाखांहून अधिक रेमडेस्व्हिर इंजेक्शनच्या कुप्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या आवश्यक पायाभूत सुविधांमधे वाढ करण्यासाठी आणि सहाय्य करण्यासाठी वितरीत केल्या जात आहेत. जलद सीमाशुल्क मंजूरी देत केंद्र सरकार हे सुनिश्चित करीत आहे की, ही जागतिक मदत हवाई आणि रस्तामार्गे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे त्वरित पोहोचली जाईल.
दुसर्या महत्त्वपूर्ण घटनेत, देशभरातील आत्तापर्यंत देण्यात आलेल्या कोविड-19 लसींच्या एकूण मात्रांची संख्या 17 कोटीवर पोहोचली आहे तसेच लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाचा वेगही वाढत आहे.
17 कोटी कोविड लसींच्या मात्रा देणारा भारत हा जागतिक स्तरावरील सर्वात वेगवान देश ठरला आहे. चीनला ही महत्वपूर्ण संख्या गाठायला 119 दिवस आणि अमेरिकेला 115 दिवसांचा कालावधी लागला होता.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 17,01,76,603 लसींच्या मात्रा 24,70,799 सत्रांद्वारे देण्यात आल्या आहेत. यात 95,47,102 पहिली मात्रा, 64,71,385 दुसरी मात्रा तर 1,39,72,612 आघाडीवरील कर्मचारी (1 ली मात्रा), 77,55,283 आघाडीवरील कर्मचारी (दुसरी मात्रा) 18-45 वयोगटातील, 20,31,854 लाभार्थी (पहिली मात्रा) 45 ते 60 वर्षे वयोगटातील 5,51,79,217 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 65,61,851 लाभार्थी (द्वितीय मात्रा) 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 5,36,74,082 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 1,49,83,217 लाभार्थंना द्वितीय मात्रा देण्यात आल्या आहेत.
देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 66.79% मात्रा दहा राज्यांतून देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 18 ते 44 वर्षे वयोगटातील 2,46,269 लाभार्थ्यांना कोविड लसीची पहिली मात्रा देण्यात आली असून आज 30 विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकत्रितपणे मिळून 20 ,31,854 लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
गेल्या 24 तासांत 6.8 लाख लाभार्थ्यांना लसीच्या मात्रा देण्यात आल्या. आज लसीकरणाच्या 114व्या दिवशी (9 मे 2021) 6,89,652 लसींच्या मात्रा देण्यात आल्या. एकूण 5,685 सत्रांमध्ये 4,05,325 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा तर 2,84,327 लाभार्थ्यांना त्यांच्या लसीची दुसरी मात्रा मिळाली.
आज भारतात एकूण 1,86,71,222 रूग्ण कोविडमुक्त झाले. बरे झालेल्या रुग्णांचा राष्ट्रीय दर 82.39% इतका आहे. गेल्या 24 तासांत 3,53,818 रूग्ण कोविडमुक्त झाले असल्याची नोंद झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांपैकी 74.38% रूग्ण दहा राज्यांतील आहेत.
गेल्या 24 तासांत 3,66,161 नवीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासांत दहा राज्यांमध्ये 73.91% नवीन रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात सर्वाधिक नवीन 48,401 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ कर्नाटकमध्ये रुग्णांची नोंद झाली 47,930 आहे तर केरळमध्ये 35,801 नवीन रुग्णांची नोंद केली गेली आहे.
भारतातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 37,45,237 वर पोहोचली आहे. हे प्रमाण आता देशातील एकूण रुग्णसंख्येच्या 16.53% आहे. गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रूग्णसंख्येत 8,589 रुग्णांची भर पडल्याची नोंद झाली आहे. भारतातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 82.89 %रूग्ण हे 13 राज्यांत एकवटले आहेत.
राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत आहे आणि सध्या तो 1.09% इतका आहे. गेल्या 24 तासांत 3,754 मृत्यूची नोंद झाली.
दहा राज्यांत नवीन मृत्यूंचे प्रमाण 72.86% इतके आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले (572). त्याखालोखाल कर्नाटकमध्ये दैनंदिन 490 मृत्यू झाले.
गेल्या 24 तासांत तीन राज्ये / केंद्रशासित प्रदेशात कोविड-19 मुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. यात दीव आणि दमण, दादरा आणि नगरहवेली, अरुणाचल प्रदेश आणि लक्षद्वीप यांचा समावेश आहे.
इतर अपडेट्स :
- केंद्र सरकार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीचा मोफत पुरवठा करून राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेला पाठबळ पुरवीत आहे.
- केंद्र सरकारने कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणावरील खर्चासाठी तरतूद केली नाही असे म्हणणे खरं तर चुकीचे आहे. 'राज्यांना हस्तांतरण’ या शीर्षकाखाली अनुदान मागणी क्रमांक 40 अंतर्गत 35,000 कोटी रुपये दाखवले आहेत.
- संपूर्णतः सरकार दृष्टीकोनाच्या माध्यमातून सुव्यस्थित आणि पद्धतशीर यंत्रणेच्या सहाय्याने, केंद्र सरकारची विविध मंत्रालये तसेच विभाग संयुक्त सहकार्यातून, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देशात आलेल्या जागतिक मदत सामग्रीचे अखंडितपणे वितरण करीत आहेत.
- रेल्वे विभागाने देशभरातील विविध राज्यांना 295 टँकर्सच्या वाहतुकीतून वैद्यकीय वापरासाठीच्या सुमारे 4700 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.
- देशातील सध्याची कोविड परिस्थिती हाताळण्यासाठी वैद्यकीय सामग्रीचा अव्याहत पुरवठा करण्याच्या दृष्टीने भारतीय वायुदल आणि भारतीय नौदल अथक कार्यरत आहेत.
- ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीनुसार पुरेसा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्सिजनची उपलब्धता वाढवणे, वितरणात सुसूत्रता आणि ऑक्सिजन साठवणूक विषयक पायाभूत सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने विविध पावले उचलली आहेत.
- समुद्रसेतू-2 मोहिमेचा भाग म्हणून, भारतीय नौदलाच्या त्रिकंड या जहाजावर, कतारच्या हमाद बंदरावरून द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचे क्रायोजेनिक कंटेनर्स मुंबईपर्यंतच्या वाहतुकीची सोपविण्यात आलेली जबाबदारी पार पडली.
- वाणिज्य विभागातील परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाच्या 'कोविड -19 हेल्पडेस्क'ने 26.04.2021 पासून निर्यातदार समुदायांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत माहिती संकलित करायला सुरुवात केली आहे, जेणेकरून व्यापार आणि उद्योगांना सामोरे जावे लागत असलेल्या समस्यांवर त्वरेने तोडगा काढता येईल.
महाराष्ट्र अपडेट:
महाराष्ट्रात आज नव्या बाधित रुग्णसंख्येत लक्षणीय घट दिसून आली असून शनिवारच्या तुलनेत 5,204 कमी रुग्णसंख्या नोंदली गेली. काल, 24 तासांच्या कालावधीत राज्यात 53,605 नवीन रुग्णसंख्या नोंदली गेली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दक्षिण नागपुरात 50 अलगीकरण खाटांच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन झाले. मध्यम लोकसेवा प्रतिष्ठान, जैन कालर समाज आणि मराठा युवा समाज यांच्यामार्फत चालवण्यात येत असलेले हे केंद्र कोविडची सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना मोफत सुविधा पुरवेल. रेशीमबाग येथील या केंद्राकडे सध्या 50 अलगीकरण खाटा आहेत. महाराष्ट्राला रविवारी कोविशिल्ड लसीच्या एकूण 1,053,000 मात्रा मिळाल्या. त्यापैकी 3,50,000 सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून 18-44 वयोगटाच्या लसीकरणासाठी खरेदी करण्यात आल्या.
IMPORTANT TWEETS
PIB FACT CHECK
* * *
M.Chopade/D.Rane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1717512)
Visitor Counter : 154