रेल्वे मंत्रालय

ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी एका दिवसात वैद्यकीय वापरासाठीच्या 831मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनची केली विक्रमी वाहतूक

Posted On: 10 MAY 2021 6:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 मे 2021

 

मार्गातील सर्व अडथळे पार करत आणि समस्यांवर नवी उत्तरे शोधत भारतीय रेल्वेने देशातील विविध राज्यांना वैद्यकीय वापरासाठीच्या द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा करून या राज्यांना दिलासा देण्याचे कार्य सुरु ठेवले आहे. आतापर्यंत, रेल्वे विभागाने देशभरातील विविध राज्यांना 295 टँकर्सच्या वाहतुकीतून वैद्यकीय वापरासाठीच्या सुमारे 4700 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.

कालच्या एका दिवसात 75 ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी वैद्यकीय वापरासाठीच्या 831 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनचा विक्रमी पुरवठा केला.

आतापर्यंत 75 ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी त्यांचा प्रवास पूर्ण केला आहे.

ऑक्सिजनची मागणी करणाऱ्या राज्यांना अत्यंत कमी वेळात शक्य तितक्या जास्तीत जास्त प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न आहे.

हे पत्रक जारी होईपर्यंत, वैद्यकीय वापरासाठीचा 293 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन महाराष्ट्रात उतरविण्यात आला आहे.

 

* * *

M.Chopade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1717497) Visitor Counter : 192