वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
डीजीएफटीच्या कोविड-19 हेल्पडेस्ककडून आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधित समस्यांचा समन्वय आणि त्यांचे निराकरण
Posted On:
10 MAY 2021 5:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मे 2021
कोविड -19 रुग्णांमधील वाढ लक्षात घेऊन वाणिज्य विभागातील परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाच्या 'कोविड -19 हेल्पडेस्क'ने 26.04.2021 पासून निर्यातदार समुदायांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत माहिती संकलित करायला सुरुवात केली आहे, जेणेकरून व्यापार आणि उद्योगांना सामोरे जावे लागत असलेल्या समस्यांवर त्वरेने तोडगा काढता येईल.
वाणिज्य विभाग / डीजीएफटीशी संबंधित विविध समस्या, आयात व निर्यात परवाना समस्या, सीमाशुल्क विभागाकडून मंजुरीला विलंब आणि त्यातून उद्भवणाऱ्या अडचणी, आयात / निर्यात दस्तऐवजीकरण समस्या , बँकिंग बाबी, वाहतूक / बंदर हाताळणी / नौवहन / हवाई वाहतुकीच्या समस्या आणि निर्यात वस्तूंचे कारखाने चालवण्यासाठी मनुष्यबळाची उपलब्धता या प्रमुख क्षेत्रांची हेल्पडेस्ककडून तपासणी केली जात आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांची इतर मंत्रालये / विभाग / संस्थांसंदर्भात व्यापाराशी संबंधित समस्यांची पडताळणी केली जात आहे आणि संबंधित संस्थांसोबत त्यावर तोडगा काढला जात आहे.
हेल्पडेस्कद्वारे मदतीसाठी निश्चित केलेल्या प्रमुख क्षेत्रांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे –
- ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर / ऑक्सिमीटर / कोविड संबंधित वैद्यकीय उपकरणांची आयात - नियमन आणि शिथिलतेसाठी विनंती करण्यात आली
- परवाने संदर्भातील आवेदन स्थिती;
- बँकिंग संबंधित समस्या - शिपिंग बिले आरबीआय ईडीपीएमएस प्रणालीमध्ये दिसून येत नाहीत.
- सीमा शुल्क विभागाकडून मंजुरी समस्या
- दस्तऐवजीकरण समस्या
- निर्यात बंधन विस्तार
- वाहतूक/ बंदर हाताळणी / नौवहन / हवाई वाहतूक
- 15 दिवसांच्या कालावधीत, समर्थन, धोरण स्पष्टता आणि शिथिलतेची मागणी करणाऱ्या 163 विनंत्या प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी 78 चे पूर्ण निराकरण झाले आहे. या कालावधीत समन्वय / निराकरण झालेल्या मुख्य समस्यांमध्ये पुढील बाबींचा समावेश होता –
- 6 मे 2021 रोजी, पीईएसओ ने ऑक्सिजन सिलिंडर्स आणि क्रायोजेनिक टँकर्स / कंटेनर्सची आयात करायला मंजुरी देण्यापूर्वी जागतिक उत्पादकांच्या उत्पादन सुविधांच्या प्रत्यक्ष तपासणी न करता ऑनलाइन नोंदणी सुलभ करून आयातीच्या नोंदणीसाठी निकष शिथिल केले आहेत ;
- भारतात ऑक्सिजन सिलिंडर्स आयात करण्यासाठी बीआयएस आणि एसआयएमएसच्या आवश्यकतेचा मुद्दा. यामुळे अनुपालन ओझे कमी होईल आणि एसआयएमएस नोंदणीसाठी द्यावे लागणारे शुल्क माफ होईल
- एफटीपीअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी निर्यातदारांना त्यांचा डेटा अद्ययावत करता यावा यासाठी आरबीआय-ईडीपीएमएस प्रणालीमध्ये प्रतिबिंबित न होणाऱ्या शिपिंग बिलांचा मुद्दा डीजीएफटीने आरबीआयसमोर उपस्थित केला.
- औद्योगिक उपक्रमांसाठी ऑक्सिजन पुरवठा करण्याची काही उद्योगांची विनंती आणि ऑक्सिजन निर्मिती संयंत्र स्थापनेसाठी अनुदान देण्याच्या मागणीचा मुद्दा डीजीएफटीने डीपीआयआयटीकडे उपस्थित केला;
- कापड निर्मिती उद्योगावर परिणाम करणाऱ्या कर्नाटकातील लॉकडाऊनच्या समस्येचे डीजीएफटीने यशस्वीपणे निराकरण केले
उद्योग मदतीसाठी कोविड-19 हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतात आणि त्यांच्या समस्या डीजीएफटी संकेतस्थळावर (https://dgft.gov.in) किंवा dgftedi[at]nic[dot]in वर ईमेलने पाठवू शकतात. प्राधान्याने प्राप्त या सर्व बाबी वाणिज्य विभाग इतर सर्व मंत्रालये / विभाग आणि राज्य सरकारे / केंद्रशासित प्रदेशांसमोर मांडण्यासाठी वचनबद्ध आहे.
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1717458)
Visitor Counter : 283