आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड मदत सामग्री बाबत अद्ययावत माहिती


“संपूर्णतः सरकार” दृष्टीकोणाच्या माध्यमातून केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जागतिक मदत सामग्रीचे तातडीने वितरण केले आहे

आतापर्यंत 8900 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 5043 ऑक्सिजन सिलेंडर्स,18 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे,5698 व्हेन्टिलेटर्स/बाय पॅप; रेमडेसिवीर औषधाच्या सुमारे 3.4 लाख कुप्या यांचे वितरण झाले/ वितरणासाठी रवाना झाले

Posted On: 10 MAY 2021 6:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 मे 2021


देशात कोरोना संसर्गात झालेल्या अभूतपूर्व वाढीशी सामना करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये मदत करण्यासाठी जगभरातील विविध देश तसेच संस्थांकडून 27 एप्रिल 2021 पासून कोविड -19 आजारावरील उपचारात सहाय्यक ठरणाऱ्या वैद्यकीय सामानाच्या तसेच साधनांच्या स्वरुपात भारताला आंतरराष्ट्रीय देणग्या आणि मदत प्राप्त होत आहे. संपूर्णतः सरकार दृष्टीकोनाच्या माध्यमातून सुव्यस्थित आणि पद्धतशीर यंत्रणेच्या सहाय्याने, केंद्र सरकारची विविध मंत्रालये तसेच विभाग संयुक्त सहकार्यातून, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देशात आलेल्या जागतिक मदत सामग्रीचे  अखंडितपणे वितरण करीत आहेत.

आतापर्यंत एकूण 8900 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 5043 ऑक्सिजन सिलेंडर्स,18 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे, 5698 व्हेन्टिलेटर्स/बाय पॅप; रेमडेसिवीर औषधाच्या सुमारे 3.4 लाख कुप्या यांचे रस्ते तसेच हवाई वाहतुकीच्या माध्यमातून वितरण झाले आहे किंवा ते सामान वितरणासाठी रवाना झाले आहे.

इंग्लंड, दक्षिण कोरिया तसेच भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी मंचाच्या (USISPF) माध्यमातून 9 मे 2021 ला प्राप्त झालेले मुख्य सामान

  • व्हेन्टिलेटर्स/बाय पॅप / सी पॅप (1,000)
  • ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स (2,267)
  • ऑक्सिमीटर (10,000)
  • सिलेंडर्स (200)

उपलब्ध सामानाचे परिणामकारकरित्या त्वरित वितरण आणि प्राप्तकर्त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याचा अखंडित पुरवठा ही सतत सुरु असलेली प्रक्रिया आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय सर्वसमावेशकतेने आणि नियमितपणे या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत एका समर्पित समन्वय गटाची स्थापना करण्यात आली असून हा गट परदेशातून आलेल्या कोविड -19 मदत सामग्रीचे अनुदान, मदत आणि देणगी स्वरुपात स्वीकार आणि वितरण करण्याचे काम करीत आहे. हा गट 26 एप्रिल 2021 पासून कार्यान्वित करण्यात आला असून आरोग्य मंत्रालयाने त्याची प्रमाणित कार्यान्वयन प्रक्रिया तयार करून 2 मे 2021 पासून ती  लागू केली आहे. 


Photo 1. महाराष्ट्रात वितरण करण्यासाठी डेन्मार्कहून 9 मे 2021 ला 40 व्हेन्टिलेटर्स मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले

     
Photo2: महाराष्ट्रातील रुग्णालयांसाठी9 मे 2021 ला  डेन्मार्क येथून 13 व्हेन्टिलेटर्स आणि सेल्सफोर्स कडून 300 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स  प्राप्त झाले आहेत 

Photo 3: हिंडन हवाई तळावर  इस्रायल हून आलेले ऑक्सिजन निर्मिती संयंत्र  कर्नाटकात पाठवणीसाठी तयार 

Photos 4:  पोर्ट ब्लेयर येथे 10 मे 2021 ला 44 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि अॅडाप्टर व नेसल कॅन्यूला यांचे 102 खोके ताब्यात घेताना दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांचे उपायुक्त


* * *

Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1717480) Visitor Counter : 244