आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारत सरकारने आतापर्यंत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या 17.49 कोटींहून अधिक मात्रा मोफत पुरविल्या
पुढील लसीकरणासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे लसीच्या 84 लाखांहून अधिक मात्रा अजूनही उपलब्ध
याव्यतिरिक्त येत्या 3 दिवसांत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आणखी 53 लाखांहून जास्त मात्रा मिळणार
प्रविष्टि तिथि:
08 MAY 2021 10:45AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 8 मे 2021
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने समन्वित दृष्टिकोनाचा अवलंब करत केंद्र सरकार, कोविड-19 विरोधी लढाईत आघाडीवर आहे. या महामारीचा प्रतिबंध करण्यासाठी तसेच त्याच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या चाचण्या, रुग्णाच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, उपचार आणि कोविडला प्रतिबंध करणारी वर्तणूक याबरोबरच लसीकरण हा या महामारी विरोधातल्या व्यवस्थापनातला भारत सरकारच्या पंच सूत्री धोरणाचा अविभाज्य भाग आहे.
कोविड-19 लसीकरणाच्या आणि गतिशील तिसऱ्या टप्याची 1 मे 2021 पासून अंमलबजावणी सुरु झाली आहे. नव्या पात्र वयोगटाच्या नोंदणी 28 एप्रिलपासून सुरु झाली आहे. संभाव्य लाभार्थी को विन पोर्टलवर (cowin.gov.in) थेट किंवा आरोग्य सेतू ऐपद्वारे
कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या, व्यापक आणि वेगवान अशा तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी 1 मे 2021 पासून सुरु झाली आहे. नव्या पात्र गटातील लसीकरणासाठीची लाभार्थ्यांची नोंदणी 28 एप्रिल पासून सुरु करण्यात आली. लसीकरण करून घेण्यासाठी पात्र लाभार्थी कोविन पोर्टलवर (cowin.gov.in) थेट किंवा आरोग्यसेतू अॅपच्या माध्यमातून नोंदणी करू शकतात.
केंद्र सरकारने आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 17 कोटी 49 लाखांहून जास्त (17,49,57,770) मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरविल्या आहेत. आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, वाया गेलेल्या मात्रांच्या संख्येसह एकूण 16,65,49,583 मात्रा वापरण्यात आल्या आहेत.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांकडे अजूनही कोविड प्रतिबंधक लसीच्या 84 लाखांहून जास्त (84,08,187) मात्रा शिल्लक आहेत.
याशिवाय, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना यापूर्वी पुरवण्यात आलेल्या मात्रांव्यतिरिक्त 53 लाखांहून अधिक (53,25,000) मात्रा, येत्या 3 दिवसांत पुरविण्यात येणार आहेत.




***
Sonal T/Sanjana C/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1716990)
आगंतुक पटल : 285