PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 05 MAY 2021 8:30PM by PIB Mumbai

 

  • Govt. of India has so far provided more than 17.02 crore vaccine doses to States/UTs Free of Cost
  • Over 36 Lakh doses in addition will be received by the States/UTs in the next 3 days
  • DRDO to install five Medical Oxygen Plants in Delhi & Haryana

 

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

 नवी दिल्ली/मुंबई, 5 मे 2021

 

कोविड प्रतिबंधक लस वाया जाण्याचे प्रमाण कमी करून समाजासमोर नवे उदाहरण निर्माण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यसेवा कर्मचारी आणि परिचारिकांचे कौतुक केले आहे.

 

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत (तिसरा टप्पा) राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभार्थ्यांना मे आणि जून 2021 या आणखी दोन महिन्यांसाठी अतिरिक्त अन्नधान्य पुरवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

कोविड-19 महामारी विरोधातल्या लढ्यात, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने,  समन्वित दृष्टिकोनाचा अवलंब करत, केंद्र सरकार अग्रेसर आहे. चाचण्या, रुग्णाच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, उपचार आणि कोविडला प्रतिबंध करणारी वर्तणूक याबरोबरच लसीकरण हा या महामारी विरोधातल्या व्यवस्थापनातला भारत सरकारच्या पंच सूत्री धोरणाचा अविभाज्य भाग आहे.

कोविड-19 लसीकरणाच्या  व्यापक आणि गतिशील तिसऱ्या टप्याची  1 मे 2021 पासून  अंमलबजावणी सुरु झाली आहे. नव्या पात्र वयोगटाच्या लसीकरणासाठीची नोंदणी 28 एप्रिलपासून सुरु झाली आहे. संभाव्य लाभार्थी को विन पोर्टलवर (cowin.gov.in) थेट किंवा आरोग्य सेतू ऐपद्वारे नोंदणी करू शकतात.

केंद्र सरकारने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत सुमारे 17.02 कोटी (17,02,42,410) लसींच्या मात्रा मोफत पुरवल्या आहेत. आज सकाळी आठ वाजता उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, यामधल्या वाया गेलेल्या लसींच्या मात्रांसह एकूण 16,07,94,796  मात्रा वापरण्यात आल्या.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही 94.47  लाखाहून अधिक (94,47,614) कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा वापरण्यासाठी उपलब्ध आहेत.

याशिवाय येत्या 3 दिवसात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 36 लाखाहून अधिक (36,37,030) मात्रा मिळणार आहेत.

 

इतर अपडेट्स:

 

महाराष्ट्र अपडेट्स 

महाराष्ट्रातील, मुंबईसह 15 जिल्ह्यांमध्ये कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येत घट होतांना दिसते आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये अद्याप रुग्णवाढ दिसते आहे, असे त्यांनी सांगितले. कोल्हापूर मध्ये रुग्णसंख्येत होत असलेली वाढ रोखण्यासाठी, उद्यापासून पुढचे 10 दिवस जनता कर्फ्यू लागू केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने केंद्र सरकारला दोन वेगवेगळी पत्रे लिहून ऑक्सिजनची राज्यातली रोजची आवश्यकता सांगितली आहे.

IMPORTANT TWEETS

 

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1716240) Visitor Counter : 261