वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

ऑक्सिजन सिलेंडर आणि क्रायोजनिक टॅन्कर आणि कंटेनर आयातीसाठीची प्रक्रिया सुलभ

Posted On: 05 MAY 2021 7:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 मे 2021

 

ऑक्सिजन सिलेंडर आणि क्रायोजनिक टॅन्कर तसेच कंटेनर आयातीसाठी, पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्थेकडून (पीईएसओ), नोंदणी  आणि जागतिक उत्पादकांना मंजुरी यासाठीच्या सध्याच्या  प्रक्रियेचा केंद्र सरकारने आढावा घेतला. कोविड महामारी लक्षात घेता, नोंदणी किंवा मंजुरी देण्यापूर्वी  जागतिक उत्पादन सुविधांची पीईएसओ, भौतिक तपासणी करणार नाही.

उत्पादकांनी तपशील,उत्पादकाचे आयएसओ प्रमाणपत्र,सिलेंडर/ टॅन्कर,कंटेनर यांची सूची, त्यांचा तपशील, बॅच क्रमांक, हायड्रो चाचणी प्रमाणपत्र सादर केल्यानंतर कोणताही विलंब न करता अशी परवानगी ऑनलाईन मंजूर करण्यात येईल. अधिक तपशीलासाठी एस डी  मिश्र, स्फोटक नियंत्रक, पीईएसओ (मोबाईल क्रमांक 9725850352, ई मेल आयडी sdmishra@explosives.gov.in)  आणि डॉ एस के सिंग, स्फोटक नियंत्रक, पीईएसओ (मोबाईल क्रमांक 8447639102, ई मेल आयडी sksingh@explosives.gov.in) इथे संपर्क साधता येईल.

 

* * *

M.Chopade/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1716338) Visitor Counter : 301