पंतप्रधान कार्यालय
कोविड प्रतिबंधक लस वाया जाण्याचे प्रमाण कमी केल्याबद्दल पंतप्रधानांनी आरोग्यसेवा कर्मचारी आणि परिचारिकांचे केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
05 MAY 2021 12:53PM by PIB Mumbai
कोविड प्रतिबंधक लस वाया जाण्याचे प्रमाण कमी करून समाजासमोर नवे उदाहरण निर्माण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यसेवा कर्मचारी आणि परिचारिकांचे कौतुक केले आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या ट्वीट संदेशाचा उल्लेख करून पंतप्रधानांनी त्यांच्या ट्वीट संदेशात लिहिले आहे की, “कोविड प्रतिबंधक लस वाया घालविण्याचे प्रमाण कमी करून आपले आरोग्यसेवा कर्मचारी आणि परिचारिकांनी समाजासमोर नवे उदाहरण निर्माण केले आहे. कोविड-19 विरोधातील लढा मजबूत करण्यासाठी कमीत कमी प्रमाणात लस वाया जाऊ देण्याला मोठे महत्त्व आहे.”
***
ST/Sanjana C/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1716144)
आगंतुक पटल : 364
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam