आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्र सरकारने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 17.02 कोटीपेक्षा जास्त मोफत लसींच्या मात्रा पुरवल्या
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही 94.47 लाखाहून अधिक लसींच्या मात्रा उपलब्ध
याशिवाय येत्या 3 दिवसात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 36 लाखा लाखाहून अधिक लसींच्या मात्रा मिळणार
Posted On:
05 MAY 2021 10:49AM by PIB Mumbai
कोविड-19 महामारी विरोधातल्या लढ्यात, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने, समन्वित दृष्टिकोनाचा अवलंब करत, केंद्र सरकार अग्रेसर आहे. चाचण्या,रुग्णाच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, उपचार आणि कोविडला प्रतिबंध करणारी वर्तणूक याबरोबरच लसीकरण हा या महामारी विरोधातल्या व्यवस्थापनातला भारत सरकारच्या पंच सूत्री धोरणाचा अविभाज्य भाग आहे.
कोविड-19 लसीकरणाच्या व्यापक आणि गतिशील तिसऱ्या टप्याची 1 मे 2021 पासून अंमलबजावणी सुरु झाली आहे. नव्या पात्र वयोगटाच्या लसीकरणासाठीची नोंदणी 28 एप्रिलपासून सुरु झाली आहे. संभाव्य लाभार्थी को विन पोर्टलवर (cowin.gov.in) थेट किंवा आरोग्य सेतू ऐपद्वारे नोंदणी करू शकतात.
केंद्र सरकारने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत सुमारे 17.02 कोटी (17,02,42,410) लसींच्या मात्रा मोफत पुरवल्या आहेत. आज सकाळी आठ वाजता उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, यामधल्या वाया गेलेल्या लसींच्या मात्रांसह एकूण 16,07,94,796 मात्रा वापरण्यात आल्या.
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही 94.47 लाखाहून अधिक
(94,47,614) कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा वापरण्यासाठी उपलब्ध आहेत.
याशिवाय येत्या 3 दिवसात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 36 लाखाहून अधिक (36,37,030) मात्रा मिळणार आहेत.
***
JPS/Nilima C/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1716101)
Visitor Counter : 314