रेल्वे मंत्रालय
रेल्वेने 4400 पेक्षा अधिक कोविड केअर कोचेसमध्ये 70,000 अलगीकरण बेड उपलब्ध केले
Posted On:
05 MAY 2021 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मे 2021
कोविडविरोधात अथक संघर्षात रेल्वे मंत्रालय अलगीकरण कोचेस मागणीच्या ठिकाणी (संबंधित राज्यांनी केलेल्या )त्वरेने पाठवण्यासाठी मनुष्यबळ आणि सामुग्रीची जुळवाजुळव करत आहे. अलगीकरण कक्ष म्हणून उपयोग करण्यासाठी रेल्वेने जवळपास 70,000 खाटा असलेले 4400 अलगीकरण कोचेस उपलब्ध केले आहेत. हे अलगीकरण कोच सहजपणे हलवले जाऊ शकतात आणि भारतीय रेल्वे मार्गावर मागणीच्या ठिकाणी तैनात केले जाऊ शकतात. रेल्वेकडून संबंधित जिल्हा प्रशासनासमवेत सामायिक जबाबदाऱ्याबाबत करार आणि जलद कृती योजना त्वरित आखल्या जात आहेत.
नंदुरबार (महाराष्ट्र) येथे गेल्या काही दिवसांत 14 नवीन रुग्ण दाखल झाले असून असून 13 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. 26 कोविड रूग्ण सध्या या सुविधेत अलगीकरणात आहेत. राज्य आरोग्य प्रशासनाद्वारे आतापर्यंत 104 रुग्णांना प्रवेश देण्यात आला असून 78 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. रेल्वेने अजनी इनलँड कंटेनर डेपो येथे 11 कोविड केअर कोच ( वैद्यकीय कर्मचारी आणि पुरवठ्यासाठी खास एक कोच ) तैनात केले आहेत आणि नागपूर महानगरपालिकेला हस्तांतरित केले आहेत. येथे 6 रूग्ण दाखल झाले होते आणि 4 जणांना घरी सोडण्यात आले
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1716334)
Visitor Counter : 297