ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
28 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी पीएमजीकेएवाय-III अंतर्गत वितरणासाठी भारतीय खाद्य महामंडळाच्या आगारांमधून धान्य उचल सुरु केली
प्रविष्टि तिथि:
04 MAY 2021 6:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मे 2021
देशात कोविड -19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरीब व गरजू लोकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने मे आणि जून 2021 या दोन महिन्यांसाठी या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे , जेणेकरून एनएफएसए अंतर्गत गरीब आणि असुरक्षित लाभार्थीना या अभूतपूर्व संकटकाळात अन्नधान्याची टंचाई भासू नये .

या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भारतीय खाद्य महामंडळाने यापूर्वीच सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरेसे धान्य ठेवले आहे आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेश सरकारांना धान्य पुरवठा सुरू केला आहे. 3 मे, 2021 पर्यंत, 28 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी खाद्य महामंडळाच्या आगारांमधून उचल सुरू केली आहे आणि लाभार्थ्यांना पुढील वितरणासाठी 5.88 एलएमटी अन्नधान्य पुरवठा केला आहे.

या विशेष योजनेअंतर्गत, अंत्योदय अन्न योजना (एएवाय) आणि प्राधान्य कुटुंबे (पीएचएच) या अन्न सुरक्षा कायद्याच्या दोन्ही प्रकारांतर्गत समाविष्ट सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना त्यांच्या नियमित मासिक पात्रतेपेक्षा जास्त दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो प्रमाणे मोफत धान्याचा (तांदूळ / गहू) अतिरिक्त कोटा प्रदान केला जात आहे.




M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1715966)
आगंतुक पटल : 282