शिक्षण मंत्रालय

मे, 2021 महिन्यात नियोजित असलेल्या सर्व ऑफलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या

Posted On: 03 MAY 2021 9:24PM by PIB Mumbai

 

कोविड-19 ची लाट वेगाने पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर मे,2021 मध्ये नियोजित असलेल्या सर्व ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याची विनंती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने केली आहे.

देशातल्या  सर्व केंद्र सरकार पुरस्कृत संस्थांना उच्च शिक्षण विभागाचे सचिव अमित खरे यांनी पत्र पाठवले असून, मे महिन्यात नियोजित असलेल्या सर्व ऑफलाईन म्हणजेच प्रत्यक्ष केंद्रांवर होणाऱ्या परीक्षा रद्द कराव्यात अशी विनंती केली आहे. ऑनलाईन परीक्षा मात्र घेतल्या जाऊ शकतील.

जूनच्या पहिल्या आठवड्यात या निर्णयाचा आढावा घेतला जाईल, असेही या पत्रात म्हटले आहे. 

संस्थेतील कोणालाही काहीही गरज किंवा मदत लागली तर, त्यांना ती त्वरित पुरवली जावी, जेणेकरुन कोणत्याही व्यक्तीसमोर अडचण अथवा संकट असेल तर ते त्यातून बाहेर पडू शकतील. सर्व संस्थांनी पात्र व्यक्तींनां लस घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे आणि सर्वांकडून कोविड नियमांचे पालन होईल, अशी दक्षता घ्यावी, अशी सूचनाही या पत्रात देण्यात आली आहे.

***

M.Chopade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1715782) Visitor Counter : 182