आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशभरात लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यास आरंभ झाला असून, भारतात एकूण कोविड 19 प्रतिबंधक लसींच्या सुमारे 15.68 कोटींपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या.


18 - 44 वयोगटासाठीच्या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी, 86 हजाराहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण


देशातील रूग्ण कोविडमुक्त होण्याचे प्रमाण हळूहळू वाढत असून, गेल्या 24 तासांत सुमारे 3 लाख रुग्ण कोविडमुक्त

Posted On: 02 MAY 2021 10:29AM by PIB Mumbai

केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने कोविड विरोधातील लढाईचे नेतृत्व करत आहे. केंद्र सरकारच्या महामारी नियंत्रण आणि व्यवस्थापन (चाचणी, शोध, उपचार आणि कोविड अनुरुप वर्तन यांचा समावेश) या पाच सूत्री धोरणाचा लसीकरण हा एक अविभाज्य भाग बनला आहे.

 

कोविड -19 लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात उदार आणि वेगवान रणनितीची अंमलबजावणी 1 मे 2021 पासून सुरू झाली आहे. नवीन पात्र लोकसंख्या गटाची नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू झाली आहे.


देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या  तिसऱ्या टप्प्यात  कालपर्यंत लसींच्या एकूण 15.68 मात्रा देण्यात आल्या आहेत. 11 राज्यांतील 18-44 वयोगटातील 86,023 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. यात छत्तीसगड (987), दिल्ली (1,472), गुजरात (51,622), जम्मू आणि काश्मिर (201), कर्नाटक (649,) महाराष्ट्र (12,525), ओदिशा ( 97) पंजाब (298), राजस्थान (1853), तामिळनाडू ( 527), आणि उत्तरप्रदेश (15,792) मात्रांचा समावेश आहे.


 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या  अहवालानुसार, आत्तापर्यंत  22,93,911 सत्रांद्वारे एकूण  15,68,16,031 लसींच्या मात्रा देण्यात आल्या. यात पहिली मात्रा घेतलेल्यांमध्ये 94,28,490 आरोग्य कर्मचारी, तर दुसरी मात्रा  घेतलेल्या  62,65,397 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.1,27,57,529 आघाडीवरील कर्मचारी (1 ली मात्रा), 69,22,093 आघाडीवरील कर्मचारी (2 री मात्रा),18 ते 44 वयोगटातील  86,023 व्यक्ति (पहिली मात्रा), 60  वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील 5,26,18,135 (1 ली मात्रा ) आणि 1,14,49,310 (2 री मात्रा) एवढ्या लाभार्थींचा समावेश आहे. तर 45 ते 60 वर्षे वयोगटातील  5,32,80,976 लाभार्थी पहिली मात्रा  आणि 40,08,078 दुसरी मात्रा घेतलेले लाभार्थी आहेत.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 67 % मात्रा  दहा राज्यांमध्ये देण्यात आल्या आहेत.


 

गेल्या 24 तासांत 18 लाखांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या. 

लसीकरण मोहिमेच्या 106-व्या दिवशी (दि. 1 मे  2021) 18, 26,219 लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

यामध्ये एकूण 15,968 सत्रात 11,44,214 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 7,12,005, लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

आज भारतातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,59,92,271 आहे.

रुग्ण बरे होण्याचा  राष्ट्रीय  दर 81.77% आहे. गेल्या  24  तासांत 3,07,865 रुग्ण बरे झाले आहेत.

बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 75.59% रूग्ण हे दहा राज्यांमधील आहेत.


गेल्या 24 तासात 3,92,488  नव्या रुग्णांची नोंद झाली.


नव्या रुग्णांपैकी 72.72% रुग्ण महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या दहा राज्यांमध्ये आहेत.


महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 63,282 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल कर्नाटकमध्ये 40,990 आणि केरळमध्ये 35,636 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.


 

भारतात आज उपचाराधीन  रुग्णांची एकूण  संख्या 33,49,644 आहे. ही संख्या देशातल्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 17.13% आहे. गेल्या 24 तासांत 80,934 सक्रीय रूग्णांची भर पडल्याची नोंद झाली.


देशातल्या सक्रीय रुग्णसंख्येपैकी 81.22%  रुग्ण बारा राज्यांमध्ये आहेत.


 

देशात 29 कोटींहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत आणि एकूण पॉझिटीव्हीटी दर 6.74%आहे.

 

 

राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.10 टक्के आहे.


देशात गेल्या 24 तासात 3,689 रुग्णांचा मृत्यू झाला


 

यापैकी 76.75 टक्के मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक (802) जणांचा मृत्यू झाला, दिल्लीमध्ये 412 जणांचा मृत्यू झाला.


चार  राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात कोविड-19 मुळे एकाही मृत्यूची नोंद नाही. यामध्ये  दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, लक्षद्वीप, अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

 

***

S.Thakur/S.Patgaonkar/C.Yadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1715492) Visitor Counter : 285