वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सीमा शुल्कातून सूट दिलेल्या वस्तूंच्या यादीत व्यक्तिगत वापरासाठी आयात केलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपकरणांचा समावेश
प्रविष्टि तिथि:
01 MAY 2021 2:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मे 2021
केंद्र सरकारने, व्यक्तिगत वापरासाठी पोष्टाने, कुरियरने अथवा ई-वाणिज्य पोर्टलवरून व्यक्तिगत वापरासाठी मागवण्यात आलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपकरणांचा समावेश, सीमा शुल्कातून “भेटवस्तू” या सदराखाली सूट देण्यात आलेल्या वस्तूंच्या यादीत केला आहे. ही सवलत 31 जुलै2021 पर्यंत लागू असेल. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील, परदेश व्यापार महासंचालनालयाने 30 एप्रिल 2021 ला जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, या विशिष्ट कारणाकरिता परदेश व्यापार नीती 2015-20 च्या परिच्छेद 2.25 मध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यात आली आहे.

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1715322)
आगंतुक पटल : 381