आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताचे कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण सुमारे 15.5 कोटी


गेल्या 24 तासांत 27 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

गेल्या 24 तासांत जवळपास 3 लाख रुग्ण बरे झाले तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 1.56 कोटी पेक्षा अधिक

गेल्या 24 तासांत देशात 19.45 लाख चाचण्या, आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक चाचण्या

Posted On: 01 MAY 2021 11:26AM by PIB Mumbai

देशभरात कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून आतापर्यन्त लसींच्या एकूण 15,49,89,635 मात्रा देण्यात आल्या आहेत.  गेल्या 24 तासांत 27 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.

यामध्ये  लसीची पहिला मात्रा  घेतलेल्या 94,12,140 आरोग्य कर्मचारी आणि दुसरी मात्रा  घेतलेल्या 62,41,915 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

1,25,58,069 आघाडीवरील कर्मचारी (1 ली मात्रा ), 68,15,115 आघाडीवरील कर्मचारी (2 री मात्रा ), 45 ते 60 वर्षे वयोगटातील 5,27,07,921 (1 ली मात्रा ) आणि 37,74,930 (2 री मात्रा ) लाभार्थीचा समावेश आहे. 60  वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 5,23,78,616 लाभार्थी पहिली मात्रा  आणि 1,11,00,929 दुसरी मात्रा घेतलेले लाभार्थी आहेत.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी  67 % मात्रा या  दहा राज्यांमध्ये देण्यात आल्या आहेत

लसीकरण मोहिमेच्या (दि. 30 एप्रिल 2021) 105  व्या दिवशी  27,44,485 लसीच्या मात्रा  देण्यात आल्या.

यामध्ये 15,69,846 लाभार्थींना 23,356  सत्रात पहिली मात्रा  आणि 11,74,639  लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा  देण्यात आली.

आज भारतातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  1,56,84,406 आहे.

गेल्या  24  तासांत 2,99,988 रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा  राष्ट्रीय  दर 81.84% आहे.

बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 76.09%  हे दहा राज्यांमधील आहेत.

कोविड 19चा प्रादुर्भाव रोखण्यात महत्वाची कामगिरी बजावत भारताने गेल्या  24 तासात 19,45,299 चाचण्या केल्या. भारताचा दैनंदिन सकारात्मकता दर आता 20.66% आहे.

 गेल्या 24 तासात 4,01,993  नव्या रुग्णांची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी 73.71%  रुग्ण महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक,तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश , राजस्थान आणि बिहार या दहा राज्यांमध्ये आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 62,919 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.त्याखालोखाल कर्नाटकात  48,296  आणि केरळमध्ये 37,199 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

भारतात आज उपचाराधीन  रुग्णांची एकूण  संख्या 32,68,710 आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 17.06% आहे.

देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 78.22%  रुग्ण महाराष्ट्र,कर्नाटक, , उत्तर  प्रदेश, केरळ , राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, छत्तीसगड , तामिळनाडू , प. बंगाल , बिहार या अकरा राज्यांमध्ये आहेत.

राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.11 टक्के आहे.

गेल्या 24 तासात 3,523 रुग्णांचा मृत्यू झाला

यापैकी 76.75 टक्के मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 828 जणांचा मृत्यू झाला, दिल्लीमध्ये 375  जणांचा आणि उत्तर प्रदेशात 332 जणांचा  मृत्यू झाला.

चार  राज्ये / केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात कोविड -19 मुळे एकही मृत्यू झालेला नाही. यामध्ये  दमण आणि दीव आणि दादरा नगर हवेली,  अरुणाचल प्रदेश आणि अंदमान आणि निकोबार बेटे  यांचा समावेश आहे.

***

Jaydevi PS/SK/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1715309) Visitor Counter : 287