आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारत सरकारने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत सुमारे 16.33 कोटी मात्रा मोफत पुरवल्या


राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही 1 कोटीपेक्षा जास्त मात्रा उपलब्ध

याशिवाय येत्या 3 दिवसात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 19 लाखापेक्षा जास्त मात्रा मिळणार

प्रविष्टि तिथि: 30 APR 2021 3:07PM by PIB Mumbai

 

कोविड-19 महामारी विरोधातल्या लढ्यात केंद्र सरकार अग्रस्थानी आहे. महामारी विरोधातल्या भारत सरकारच्या पंच सूत्री धोरणाचा लसीकरण हा महत्वाचा स्तंभ आहे. (चाचण्या, रुग्णाच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, उपचार आणि कोविडला प्रतिबंध करणारी वर्तणूक यांचा या पंच सूत्री धोरणात समावेश आहे.)  कोविड-19  प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने अनेक ठोस पावले उचलली आहेत.

आज सकाळी 8 वाजता  प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार,बकेंद्र सरकारने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत सुमारे 16.33 कोटी (16,33,85030) मात्रा मोफत पुरवल्या आहेत.

यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून एकूण 15,33,56,503 मात्रा वापरण्यात आल्या.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही 1 कोटीपेक्षा जास्त  (1,00,28,527) मात्रा वापरण्यासाठी उपलब्ध आहेत.

याशिवाय येत्या 3 दिवसात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 20 लाख (19,81,110) मात्रा मिळणार आहेत.

 

***

S.Tupe/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1715045) आगंतुक पटल : 278
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam