रसायन आणि खते मंत्रालय

खत कंपन्या कोविड रुग्णांसाठी दररोज 50 मेट्रिक टन ( MT) वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करणार

Posted On: 28 APR 2021 2:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 एप्रिल 2021

रसायने आणि खते मंत्रालय, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री मनसुख मांडवीय, यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र त्याचप्रमाणे सहकारी क्षेत्रातील खत कंपन्यांतील ऑक्सिजन  निर्मितीच्या व शक्यतांचा शोध घेण्यासंदर्भात एक बैठक झाली.

मांडवीय यांनी यावेळी खत कंपन्यांना त्यांच्या ऑक्सिजनची निर्मिती करण्याच्या क्षमतेच्या स्थितीचा पुन्हा अंदाज घेऊन आणि रुग्णालयांना वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात अधिक वृध्दी करुन या महामारीच्या काळात समाजाला सहाय्य करण्याचे आवाहन केले. खत कंपन्यांनी मंत्रालयाने घेतलेल्या या पुढाकाराचे स्वागत केले आणि देशातील कोविड-19 महामारीच्या परिस्थितीशी सामना करण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नात त्वरित सामील होण्यात रुची दर्शविली.

या बैठकीत असे निष्कर्ष निघाले:

  • इफ्कोच्या (IFCO) गुजरातमधील कलोल युनिटमधे  ताशी 200 क्युबिक मीटर ऑक्सिजन निर्मिती संयंत्र लावण्यात येत असून त्याची एकूण क्षमता प्रतिदिन 33,000 क्युबिक मीटर इतकी असेल.
  • जीएसएफसीने (GSFC) आपल्या संयंत्रात लहान बदल करून द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला आहे.
  • जीएनएफसीने (GNFC) वायू विभाजन विभाग सुरू केल्यानंतर वैद्यकीय द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.
  • जीएसएफएस आणि जीएनएफसीने (GSFS & GNFC) त्यांच्या ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
  • इतर खत कंपन्या औद्योगिक सामाजिक दायित्व (सीएसआरच्या) निधीतून देशातील निवडक रुग्णालयात/जागांवर वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती संयंत्र उभारतील.

एकंदरीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे, की कोविड रुग्णांसाठी खत कंपन्यांद्वारे प्रतिदिन अंदाजे 50 मेट्रिक टन (MT) वैद्यकीय ऑक्सिजन उपलब्ध होईल. यामुळे आगामी काळात देशातील रुग्णालयांना वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यात वृद्धी होईल.

 

S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1714591) Visitor Counter : 290