रेल्वे मंत्रालय

ऑक्सिजन एक्स्प्रेस उद्या सकाळपर्यंत एकूण 450 मे टन ऑक्सिजन पुरवठा पूर्ण करेल


दिल्ली आणि उत्तर प्रदेशला जाणाऱ्या ऑक्सिजन रेल्वेगाड्या सध्या त्यांच्या मार्गावर आहेत

आणखी ऑक्सिजन आणण्यासाठी आज रात्री एक रेल्वेगाडी लखनौहून बोकारोला जाणे अपेक्षित आहे

Posted On: 26 APR 2021 6:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 एप्रिल 2021


काही दिवसांपूर्वी रिकामे टँकर घेऊन पहिली रेल्वेगाडी मुंबईहून विशाखापट्टणमला  रवाना झाल्यानंतर, भारतीय रेल्वेने 302 मेट्रिक टनपेक्षा जास्त ऑक्सिजनची संपूर्ण देशातील विविध राज्यात  सुरक्षितपणे वाहतूक केली आहे. आणखी 154 मे.टन लिक्विड  वैद्यकीय ऑक्सिजन आणला जाणार आहे. ऑक्सिजनची गरज असलेल्या राज्यांमध्ये जीवनरक्षक ऑक्सिजनच्या वाहतुकीचे आव्हान रेल्वेने हाती घेतले आहे.

आज रायगड (छत्तीसगड) येथून 4 टँकर घेऊन एक ऑक्सिजन एक्स्प्रेस  दिल्लीला पोहोचेल.

महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी आज  44 मेट्रिक टन (3 टँकरमधून) घेऊन  रेल्वेगाडी हापा (राजकोट, गुजरात) येथून कळंबोलीला (मुंबई जवळ) पोहचली.

रेल्वे राज्य सरकारांकडून प्राप्त झालेल्या सर्व विनंत्यांना प्रतिसाद देत आहे आणि अतिरिक्त ऑक्सिजन गाड्यांच्या आवश्यकतांसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहे.

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1714178) Visitor Counter : 161