आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताचे एकूण लसीकरण 14.19 कोटीच्या पुढे, सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचे 100 दिवस पूर्ण


गेल्या 24 तासात 2.19 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले

पाच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत एकाही कोविड 19 मृत्यूची नोंद नाही

Posted On: 26 APR 2021 10:42AM by PIB Mumbai

काल 100 दिवस पूर्ण केलेल्या जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेअंतर्गत देशभरात आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड19 प्रतिबंधात्मक लसीच्या मात्रांची एकूण संख्या आज 14.19 कोटीच्या पुढे गेली आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार 20,44,954 सत्रांद्वारे एकूण  14,19,11,223 लसींच्या मात्रा  देण्यात आल्या आहेत. यामध्ये  92,98,092  आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा),60,08,236 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा), 1,19,87,192  आघाडीवरील  कर्मचारी (पहिली मात्रा),  , 63,10,273 आघाडीवरील  कर्मचारी(दुसरी मात्रा), 60 वर्षावरील 4,98,72,209  लाभार्थी (पहिली मात्रा), 79,23,295 (दुसरी मात्रा),45 ते 60 वयोगटातल्या 4,81,08,293  (पहिली मात्रा), आणि 24,03,633  लाभार्थी (दुसरी मात्रा)  यांचा समावेश आहे.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 58.78 % मात्रा आठ राज्यात देण्यात आल्या आहेत.


गेल्या 24 तासात सुमारे 10  लाखापेक्षा जास्त लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण अभियानाच्या 100 व्या दिवशी (25 एप्रिल 2021) 9,95,288 लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 6,85,944  लाभार्थींना  11,984  सत्रात पहिली मात्रा  आणि 3,09,344 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा  देण्यात आली.

भारतात आतापर्यंत एकूण 1,43,04,382 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 82.62 टक्के आहे.

गेल्या 24 तासात 2,19,272 रुग्ण बरे झाले .

बरे झालेल्या रुग्णांपैकी 78.98 टक्के रुग्ण दहा राज्यांमधील आहेत.


गेल्या 24 तासात 3,52,991 नव्या रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ,  मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल , तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यांमध्ये  नवीन रुग्णांपैकी 74.5% रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 66,191 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.त्याखालोखाल  उत्तर प्रदेश 35,311 आणि कर्नाटकात 34,804 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.


आलेखात दर्शवल्याप्रमाणे बारा  राज्यात   दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ दिसून येत आहे.


भारतात आज उपचाराधीन  रुग्णांची एकूण  संख्या 28,13,658 आहे. ही देशातल्या एकूण बाधित रुग्णांच्या   16.25 टक्के  आहे.

देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 69.67 टक्के रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक , राजस्थान, तामिळनाडू , गुजरात आणि  केरळ या आठ राज्यांमध्ये आहेत.


राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.13 टक्के आहे.

गेल्या 24 तासात 2,812  रुग्णांचा मृत्यू झाला.

यापैकी  79.66% मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 832 जणांचा मृत्यू झाला, दिल्लीमध्ये 350 जणांचा मृत्यू झाला.


पाच राज्ये / केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात कोविड -19 मुळे एकही मृत्यू झालेला नाही. यामध्ये  दमण आणि दीव आणि दादरा नगर हवेली, त्रिपुरा, लक्षद्वीप, मिझोराम आणि अंदमान आणि निकोबार बेटे  यांचा समावेश आहे.

***


ST/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1714084) Visitor Counter : 291