आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात, गेल्या 24 तासांत 30 लाख लसींच्या मात्रा देण्याचे काम झाले असून, आतापर्यंत एकूण 12 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत


79% नव्या रूग्णांची नोंद 10 राज्यांत

Posted On: 17 APR 2021 11:36AM by PIB Mumbai

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा भाग असलेल्या, देशभरातील लसीकरणाने  कोविड -19 च्या लसींच्या जवळपास 12 कोटींच्या एकूण मात्रा देण्याचे काम पूर्ण केले आहे.   

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकूण 17,37,539  सत्रांद्वारे  11,99,37,641  लसींच्या मात्रा देण्यात आल्या.यापैकी 91,05,429 आरोग्य कर्मचाऱ्यांनी (HCW) लसीची पहिली मात्रा घेतली,   56,70,818  आरोग्य कर्मचाऱ्यांनी (HCW) लसीची दुसरी मात्रा घेतली,1,11,44,069, आघाडीच्या कर्मचाऱ्यांना (FLW,पहिली मात्रा ) तर 54,08,572 आघाडीच्या कर्मचाऱ्यांना (FLW,लसीची दुसरी मात्रा), वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या  4,49,35,011 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा,तर 34,88,257 लाभार्थ्यांना दुसरी  मात्रा , तसेच 45 ते 60 वर्षे वयोगटातील 3,92,23,975  लाभार्थ्यांना (पहिली मात्रा)  तर 9,61,510 लाभार्थ्यांना (दुसरी मात्रा) अशा एकूण लसींच्या मात्रा देण्यात आल्या .

 

HCWs

FLWs

Age Group 45 to 60 years

Over 60 years

 

Total

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

91,05,429

56,70,818

1,11,44,069

54,08,572

3,92,23,975

9,61,510

4,49,35,011

34,88,257

11,99,37,641

 

देशभरात आतापर्यंत दिलेल्या डोसांपैकी  59.56% डोस आठ राज्यांत दिले गेले आहेत.

 

गेल्या 24  तासांत  एकूण 30 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

काल ( दिनांक  16 एप्रिल 2021)या लसीकरणाच्या 91- व्या दिवशी 30,04,544 लसींच्या मात्रा  देण्यात आल्या. त्यात 37,817, सत्रांतून  22,96,008,लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा  देण्यात आली, तर 7,08,536  लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

 

Date: 16th April, 2021 (Day-91)

HCWs

FLWs

45 to 60 years

Over 60 years

Total Achievement

1stDose

2ndDose

1stDose

2nd Dose

1stDose

2nd Dose

1stDose

2nd Dose

1stDose

2ndDose

22,432

36,184

8,50,545

2,55,681

7,18,862

26,375

7,04,169

3,90,296

22,96,008

 

7,08,536

 

भारतातील  दैनंदिन  नवीन रुग्णसंख्येत  भर पडत आहे.गेल्या 24 तासांत 2,34,692 नव्या रुग्णांची नोंद झाली.

 

महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, मध्यप्रदेश, केरळ, गुजरात,तामिळनाडू,आणि राजस्थान या दहा राज्यांतील दररोजच्या बाधित  रुग्णसंख्येत अधिक वाढ होत बाधित रुग्णांपैकी 79.32% नवे रूग्ण या 10 राज्यांत आहेत.

 

 

महाराष्ट्राच्या   दैनंदिन बाधित रुग्णांत,  सर्वाधिक 63,729 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल उत्तरप्रदेशमधे 27,360 तर दिल्लीत 19,486 नव्या रूग्णांची नोंद झाली.

 

खालील आलेख सोळा राज्यांतील  रुग्णसंख्येचा वाढत जाणारा  कल  दर्शवित आहे.

 

भारतातील सक्रीय बाधित रूग्णसंख्या आता 16,79,740 वर पोचली आहे. देशातील एकूण बाधित  रुग्णांपैकी 11.56% रूग्ण सक्रीय आहेत. गेल्या 24 तासांत, बाधित रूग्णसंख्येत 1,09,997  सक्रीय रुग्णांची भर पडल्याची नोंद झाली. 

 

देशभरातील एकूण  बाधित रुग्णांपैकी 65.02% सक्रीय रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगड,उत्तरप्रदेश, कर्नाटक, आणि केरळ या पाच  राज्यांत आहेत.

देशातील एकूण सक्रीय  रुग्णांपैकी 38.09% रूग्ण केवळ महाराष्ट्रात आहे.

 

भारतातील बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 1,26,71,220 इतकी आहे. देशाचा बरे होण्याचा राष्ट्रीय सरासरी दर 87.23%आहे.

गेल्या 24 तासांत 1,23,354 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत 1,341 मृत्यूंची नोंद झाली.

मृत्यु झालेल्यांपैकी एकूण  85.83% मृत्यु दहा राज्यांत झाले आहेत.महाराष्ट्रात सर्वाधिक दैनंदिन  (398)मृत्यूंची नोंद झाली. त्याखालोखाल दिल्लीमध्ये 141 मृत्यूंची नोंद झाली.

 

नऊ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, गेल्या 24 तासांत कोविड-19मुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.यात लडाख(कें.प्र.) दीव आणि दमण,दादरा आणि नगरहवेली, त्रिपुरा, सिक्कीम, मिझोराम,मणीपूर,लक्षद्वीप,अंदमान आणि निकोबार तसेच अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

***

Jaydevi PS/SP/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 



(Release ID: 1712403) Visitor Counter : 241