गृह मंत्रालय

नागा गटांसोबत केलेल्या शस्त्रसंधी कराराला मुदतवाढ

Posted On: 12 APR 2021 5:48PM by PIB Mumbai

 

भारत सरकार आणि नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड / एनके (एनएससीएन/ एनके) , नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड / रिफॉर्मेशन (एनएससीएन / आर) तसेच नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड/ के - खांगो ( एनएससीएन/ के - खांगो)  यांच्यात शस्त्रसंधी  कराराची अंमलबजावणी  सुरु आहे.

या शस्त्रसंधी कराराला पुढील एक वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे.  एनएससीएन / एनके आणि एनएससीएन / आर  या गटांसाठी 28  एप्रिल , 2021पासून लागू होणारी ही मुदतवाढ 27 एप्रिल 2022 पर्यंत असेल तर एनएससीएन/ के- खांगो गटासाठी कराराची  मुदतवाढ 18 एप्रिल  2021 ते 17  एप्रिल  2022 पर्यंत लागू राहील.  12 एप्रिल 2021 रोजी या मुदतवाढ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.

***

Jaydevi PS/S.Chavhan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1711178) Visitor Counter : 254