पंतप्रधान कार्यालय

भारत-नेदरलँड्स शिखर परिषद दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न

Posted On: 09 APR 2021 9:46PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुटे यांच्यादरम्यात आज एक शिखर परिषद दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडली. मार्च-2021 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पंतप्रधान मार्क रुटे यांनी भाग घेतलेली ही पहिली उच्चस्तरीय शिखर परिषद आहे. निवडणूकीतील यश मिळवून सलग चौथ्यांदा नेदरलँडच्या पंतप्रधानपदी आल्याबद्दल रुटे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले

भारत आणि नेदरलँड्स या दोन्ही देशांमध्ये, लोकशाही मूल्ये, कायद्याचे राज्य व मानवी मूल्यांवरील विश्वास या एकसमान मूल्यांनी जोपासलेले दृढ आणि स्थिर मैत्रीचे संबध आहेत.

या शिखर परिषदेत, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबधांच्या विविध पैलूंचा सखोल आढावा घेतला आणि हे संबध वृद्धींगत करत व्यापार व अर्थव्यवस्था, जलनियोजन, कृषी क्षेत्र, स्मार्ट शहरे, विज्ञान व तंत्रज्ञान, आरोग्य आणि अंतराळ या क्षेत्रात विविधांगी संबध दृढ करणे यावर दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला.

जलसंबधीत क्षेत्रांमधील धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्यासाठी ‘जल धोरणात्मक भागीदारी’ स्थापन करण्यावर तसेच मंत्री स्तरावर पाण्यासंबधी संयुक्त कृती गट स्थापण्यावर दोन्ही पंतप्रधानांची सहमती झाली .

हवामानबदल , दहशतवादाला प्रतिबंध आणि कोविड महामारी अश्या स्थानिक व जागतिक आव्हानांवर दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला आणि भारत-पॅसिफिक , लवचिक पुरवठा साखळ्या तसेच जागतिक डिजिटल प्रशासन अश्या अनेक नवीन क्षेत्रातील उभरत्या सहकार्याचा लाभ घेण्यावर त्यांची सहमती झाली.

आंतरराष्ट्रीय सौर भागीदारी (ISA) ला सहकार्य तसेच आपत्ती निवारणासाठी पायाभूत सुविधा व्यवस्थेसाठी भागीदारी याबद्दल नेदरलँड्सला धन्यवाद दिले. नेदरलँड्सच्या भारत-पॅसिफिक धोरणाचे आणि 2023 मध्ये जी20 राष्ट्रांच्या अध्यक्षपदाविषयी केलेल्या सहयोगाचे पंतप्रधानांनी स्वागत केले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततास स्थैर्य व उत्कर्ष यासाठी नियमाधारित अनेकस्तरीय व्यवस्थेला आपण कटीबद्ध असल्याचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला व मे 2021 मध्ये पोर्तो, पोर्तुगाल येथे भारत- युरोपियन संघ नेत्यांच्या बैठकीच्या यशाबद्दल आशा व्यक्त केली.

***

JPS/VS/DY


(Release ID: 1710828) Visitor Counter : 231