कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
कोविड-19 संसर्गाला परिणामकारकरित्या आळा घालण्यासाठी 45 वर्षे आणि त्याहून जास्त वय असलेल्या सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लसीकरण करवून घेण्याचा सल्ला
Posted On:
06 APR 2021 6:48PM by PIB Mumbai
कोविड-19 संसर्गाला परिणामकारकरित्या आळा घालण्यासाठी 45 वर्षे आणि त्याहून जास्त वय असलेल्या सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने लसीकरण करवून घेण्यास सांगितले आहे. तसेच लस घेतल्यानंतर देखील वारंवार हात धुणे आणि इतर स्वच्छता पाळणे, मास्क किंवा मुखाच्छादन घालणे तसेच सुरक्षित शारीरिक अंतर राखणे यासारख्या कोविड-योग्य वागणुकीच्या नियमांचे पालन करणे सुरूच ठेवावे असा सल्ला देखील, केंद्रीय कार्मिक, तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशामध्ये दिला आहे.
केंद्र सरकार कोविडसंदर्भातील स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि कोविड-19 संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण करवून घेण्यास प्राधान्य दिल्या जाणाऱ्या गटांसंदर्भात स्वीकारलेल्या धोरणानुसार, आता, 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींना लसीकरण करवून घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात केंद्रीय कार्मिक, तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालय वेळोवेळी विविध सूचना जारी करीत आहे असे या आदेशात म्हटले आहे.
***
Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1709904)
Visitor Counter : 250