आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये दैनंदिन नवीन रुग्णांसंख्येत वाढ; या राज्यांमधे दररोजच्या एकूण नवीन रुग्णांपैकी 81% रुग्णसंख्या
कोविड प्रतिबंधक लसीकरणाची वाटचाल पाच कोटीच्या नजीक
गेल्या 24 तासांत 32,53,095 जणांचे विक्रमी लसीकरण
Posted On:
23 MAR 2021 2:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2021
महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगढ आणि तामिळनाडू या सहा राज्यांमधे दररोज नवीन रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात एकूण नोंद झालेल्या नवीन प्रकरणांपैकी 80.90% अर्थात 40,715 इतके रुग्ण या सहा राज्यातलेच आहेत.
महाराष्ट्रात दररोजच्या नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ कायम आहे. गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात 24,645 (60.53%) रुग्ण आढळले. त्याखालोखाल पंजाबमध्ये 2,299 आणि गुजरातमध्ये 1,640 नवीन रुग्ण आढळले आहेत.
फेब्रुवारीच्या मध्यामधे भारतातली रुग्णसंख्येने तळ गाठला होता मात्र त्यानंतर एकूण सक्रिय रुग्णसंख्या वाढतच आहे. सध्या ती 3.45 लाख (3,45,377) आहे. गेल्या 24 तासात एकूण सक्रिय रुग्णसंख्येच्या तुलनेत 10,731 इतकी घट झाली.
देशातील एकूण सक्रिय प्रकरणांपैकी 75.15% रुग्ण महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब या तीन राज्यातले आहेत. देशातील एकूण सक्रिय प्रकरणांपैकी एकट्या महाराष्ट्राचा वाटा 62.71% आहे.
आज सकाळी सात वाजेपर्यंत 4.8 कोटी (4,84,94,594) जणांचे 7,84,612 सत्रांमधे लसीकरण झाले आहे. पहिल्या डोसने चार कोटींचा (4,06,31,153) टप्पा ओलांडला आहे.
यामध्ये 78,59,579 आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी (पहिला डोस), 49,59,964 आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी (दुसरा डोस), 82,42,127 आघाडीवर कार्यरत कर्मचारी, (पहिला डोस) आणि 29,03,477 आघाडीवर कार्यरत कर्मचारी (दुसरा डोस), वय वर्षे 45 पेक्षा जास्त विशिष्ट आजार असलेले 42,98,310 लाभार्थी (पहिला डोस) आणि 2 कोटी पेक्षा जास्त (2,02,31,137) 60 वर्षांहून अधिक वयाच्या लाभार्थ्यांचा समावेश आहे.
HCWs
|
FLWs
|
45 to <60 years with Co-morbidities
|
Over 60 years
|
Total
|
1st Dose
|
2nd Dose
|
1st Dose
|
2nd Dose
|
1st Dose
|
1st Dose
|
78,59,579
|
49,59,964
|
82,42,127
|
29,03,477
|
42,98,310
|
2,02,31,137
|
4,84,94,594
|
लसीकरण मोहिमेच्या 66 व्या दिवशी (22 मार्च, 2021), 32 लाखांहून जास्त (32,53,095) लसीचे डोस देण्यात आले. त्यातील 29,03,030 लाभार्थींना 48,345 सत्रांमधे पहिला डोस देण्यात आला. (आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी आणि आघाडीवर कार्यरत कर्मचारी,) आणि 3,50,065 आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी आणि आघाडीवर कार्यरत कर्मचारी यांना दुसरा डोस देण्यात आला.
Date: 22nd March, 2021
|
HCWs
|
FLWs
|
45to<60 years with Co-morbidities
|
Over 60years
|
Total Achievement
|
1stDose
|
2ndDose
|
1stDose
|
2nd Dose
|
1stDose
|
1stDose
|
1stDose
|
2ndDose
|
|
69,929
|
73,804
|
1,42,159
|
2,76,261
|
5,59,930
|
21,31,012
|
29,03,030
|
3,50,065
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
भारतात आतापर्यंत एकूण 1,11,81,253 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुक्तीचा राष्ट्रीय दर 95.67% आहे.
गेल्या 24 तासांत 29,785 जण बरे होऊन घरी पतरले.
गेल्या 24 तासात 199 मृत्यूंची नोंद झाली.
दररोज होणाऱ्या मृत्यूंमध्ये सहा राज्यांचे प्रमाण 80.4% आहे. महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये प्रत्येकी 58 मृत्यू झाले आहेत. केरळ आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
चौदा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधे गेल्या 24 तासांत एकाही कोविड 19 मृत्यूची नोंद झालेली नाही. यात जम्मू-काश्मीर (केंप्र), गोवा, उत्तराखंड, ओडिशा, लक्षद्वीप, सिक्कीम, दिव-दमण, आणि दादरा-नगरहवेली, लडाख (केंप्र), मणिपूर, मेघालय, मिझोरम, अंदमान निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड यांचा समावेश आहे.
S.Tupe/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1706891)
Visitor Counter : 255
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam