आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 च्या दैनंदिन रुग्णांपैकी 80% पेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यात


देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीच्या 4.5 कोटी पेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या

मृत्युदरात 1.37% पर्यंत घट

Posted On: 22 MAR 2021 11:12AM by PIB Mumbai

महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कोविडच्या दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात नोंदवल्या गेलेल्या रुग्ण संख्येपैकी 80.5% रुग्ण या पाच राज्यातले आहेत.

गेल्या 24 तासात 46,951 नव्या रुग्णांची नोंद झाली. यापैकी 84.49% रुग्ण महाराष्ट्र, पंजाब, केरळ, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यातले आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 30,535 (65.03%). नव्या रुग्णांची नोंद झाली. पंजाबमध्ये 2,644, केरळमध्ये  1,875 नव्या रुग्णांची नोंद झाली.

 


आठ राज्यात कोविड-19 च्या दैनंदिन रुग्ण संख्येचा आलेख चढता आहे. खाली दिलेला तक्ता या आठ राज्यातल्या चाचण्या आणि पॉझीटीव्हीटी दर दर्शवतो.
 


भारतात आज 3,34,646 एकूण सक्रीय रुग्ण आहेत. भारताची सध्याची सक्रीय रुग्ण संख्या ही देशाच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्ण संख्येच्या 2.87%  आहे.


दैनंदिन पॉझीटीव्हीटी दर ( सात दिवसांची सरासरी ) सध्या 3.70% आहे.


आठ राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांचा साप्ताहिक पॉझीटीव्हीटी दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे.
 


भारतात लसीकरणाच्या 4.5 कोटीहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.

सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 7,33,597  सत्राद्वारे लसीकरणाच्या 4.50  कोटी (4,50,65,998) हून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.

यामध्ये 77,86,205 आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी (पहिली मात्रा ), 48,81,954 आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी (दुसरी मात्रा), 80,95,711 आघाडीवर राहून काम करणारे कर्मचारी (पहिली मात्रा ), 26,09,742 आघाडीवर काम करणारे कर्मचारी (दुसरी मात्रा), 37,21,455 लाभार्थी 45 वर्षावरील आणि सह व्याधी असणारे तर साठ वर्षावरील 1,79,70,931 लाभार्थी (पहिला  डोस) यांचा समावेश आहे.

लसीकरण अभियानाच्या 65 व्या दिवशी (21 मार्च 2021) लसीच्या 4,62,157  मात्रा देण्यात आल्या. रविवार असल्याने अनेक राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली नव्हती.

यापैकी  8,459 सत्राद्वारे 4,49,115 लाभार्थींना पहिली मात्रा ( आरोग्य कर्मचारी आणि आघाडी कर्मचारी ) आणि 13,042 आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरचे कर्मचारी यांना दुसरी मात्रा देण्यात आली.

भारतात आतापर्यंत 1,11,51,468 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 95.75%.आहे.

गेल्या 24 तासात  21,180 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.

गेल्या 24 तासात 212 मृत्यू झाले. यापैकी  85.85% मृत्यू सहा राज्यातले आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 99 मृत्यूंची नोंद झाली. पंजाब मध्ये 44 आणि केरळ मध्ये गेल्या 24 तासात 13 मृत्यूंची नोंद झाली.

 


मृत्यू दरात सातत्याने घट होत असून हा दर  1.37%  झाला आहे.


 

14 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात कोविड-19 मुळे एकही मृत्यूची नोंद नाही. आंध्रप्रदेश, आसाम, उत्तराखंड, लक्षद्वीप, सिक्कीम, लडाख ( केंद्र शासित प्रदेश ), दादरा नगर हवेली आणि दमण दीव, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, नागालंड, मिझोरम, अंदमान निकोबार आणि अरुणाचल प्रदेश यांचा यात समावेश आहे.

***

ST/NC/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com
 


(Release ID: 1706577) Visitor Counter : 241