आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशात गेल्या 24 तासात 77.7 % नव्या रुग्णांची नोंद
4 कोटी 40 लाखांहून जास्त जणांचे कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण
Posted On:
21 MAR 2021 3:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2021
देशातील काही राज्यांमधे रुग्णवाढीचा वेग दररोज झपाटयाने वाढत आहे. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशात गेल्या चोवीस तासात 77..7% नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या 24 तासांत 43,846 नवीन रुग्णसंख्या नोंदली गेली.
नवीन प्रकरणांपैकी 83.14% प्रकरणे 6 राज्यांमधील आहेत.
महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण कायम आहे. इथे गेल्या चोवीस तासात 27,126 रुग्ण आढळले. त्या पाठोपाठ पंजाबात. 2,578 तर केरळमधे 2,078 नवे रुग्ण आढळले आहेत.
खालील आलेखात दर्शवल्याप्रमाणे आठ राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि पाच जिल्ह्यांमधे एकूण देशातले सर्वाधिक नवीन रुग्ण आहेत.
4.4 कोटी पेक्षा जास्त ( 4,46,03,841) लसीकरण आतापर्यंत झाले आहे. आज सकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार 7,25,138 सत्रांमधे हे लसीकरण करण्यात आले.
HCWs
|
FLWs
|
45 to <60 years with Co-morbidities
|
Over 60 years
|
Total
|
1st Dose
|
2nd Dose
|
1st Dose
|
2nd Dose
|
1st Dose
|
1st Dose
|
77,79,985
|
48,77,356
|
80,84,311
|
26,01,298
|
36,33,473
|
1,76,27,418
|
4,46,03,841
|
यामधे पुढील मात्रांचा समावेश आहे. 77,79,985 आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी (पहिला डोस), 48,77,356 आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी (दुसरा डोस), 80,84,311 आघाडीवर काम करणारे कर्मचारी (पहिला डोस) आणि 26,01,298 आघाडीवर काम करणारे कर्मचारी (2 रा डोस), 36,33,473 लाभार्थी वय जास्त 45 वर्षे विशिष्ट आजार (पहिला डोस) आणि 1,76,27,418 लाभार्थी हे 60 वर्षांहून अधिक वयाचे आहेत.
HCWs
|
FLWs
|
45 to <60 years with Co-morbidities
|
Over 60 years
|
Total
|
1st Dose
|
2nd Dose
|
1st Dose
|
2nd Dose
|
1st Dose
|
1st Dose
|
77,79,985
|
48,77,356
|
80,84,311
|
26,01,298
|
36,33,473
|
1,76,27,418
|
4,46,03,841
|
लसीकरण मोहिमेच्या 64 व्या दिवशी ( 20 मार्च, 2021) 25 लाखांपेक्षा जास्त (25,40,449) लसींचे डोस देण्यात आले. त्यातील 22,83,157 लाभार्थी (आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचारी ) यांचे पहिल्या डोससाठी 38,669 सत्रांमधे लसीकरण करण्यात आले.) आणि 2,57,292 (आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचारी )यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.
भारतातील एकूण उपचार घेत असलेले रुग्ण आजघडीला 3.09 लाख (3,09,087), आहेत. गेल्या 24 तासांत यात 20,693 सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे.
दुसरीकडे, भारतात बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1,11,30,288 आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर 95.96% आहे. गेल्या 24 तासांत 22,956 रुग्ण बरे होऊन घरी परतले.
गेल्या 24 तासांत 197 मृत्यूची नोंद झाली आहे .
नवीन रुग्ण मृत्यूंमध्ये सहा राज्यांचे प्रमाण 86.8% आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू (92) झाले आहेत. पंजाबमध्ये 38 तर केरळमध्ये 15 मृत्यूची नोंद झाली आहे.
सतरा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधे गेल्या चोवीस तासात कोविड19 मुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. यात राजस्थान, आसाम, गोवा, उत्तराखंड, ओडिशा, झारखंड, लक्षद्वीप, सिक्किम, पुद्दुचेरी, दिव-दमण, दादरा- नगर हवेली, नागालँड, त्रिपुरा, लद्दाख (यूटी), मणिपूर, मिझोरम, अंदमान निकोबार बेटे आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.
* * *
Jaydevi PS/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1706432)
Visitor Counter : 205
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam