आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोरोना प्रतिबंधक लसीच्या देशभरात 2.4 कोटी मात्रा देण्यात आल्या
Posted On:
10 MAR 2021 3:58PM by PIB Mumbai
गेल्या 24 तासात लसीच्या 13.5 लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थींना देण्यात आल्या
महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू येथे दैनंदिन कोविड रुग्ण संख्येत मोठी वाढ
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार, राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात 2.43 कोटी पेक्षा जास्त म्हणजे (2,43,67,906) लसीच्या मात्रा 3,39,145 सत्राद्वारे देण्यात आल्या.
यामध्ये 71,30,098 आरोग्य कर्मचारी ( पहिली मात्रा ), 38,90,257 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा ), 69,36,480 फ्रंट लाईन कर्मचारी ( पहिली मात्रा ), 4,73,422 फ्रंट लाईन कर्मचारी(दुसरी मात्रा ), 8,33,526 जण 45 पेक्षा जास्त वय असलेल्या आणि सहव्याधी असलेले ( पहिली मात्रा ), आणि 60 वर्षावरील 51,04,123 लाभार्थी ( पहिली मात्रा ) यांचा समावेश आहे.
HCWs
|
FLWs
|
45 to <60 years with Co-morbidities
|
Over 60 years
|
Total
|
1st Dose
|
2nd Dose
|
1st Dose
|
2nd Dose
|
1st Dose
|
1st Dose
|
71,30,098
|
38,90,257
|
69,36,480
|
4,73,422
|
8,33,526
|
51,04,123
|
2,43,67,906
|
लसीकरण अभियानाच्या 53 व्या दिवशी (9 मार्च 2021) ला 13.5 लाखाहून अधिक (13,59,173) लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 10,60,944 लाभार्थींना 52,351 सत्रात पहिली मात्रा ( आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचारी ) आणि 2,98,229 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.
Date: 9th March, 2021
|
HCWs
|
FLWs
|
45 to <60 years with Co-morbidities
|
Over 60 years
|
Total Achievement
|
1stDose
|
2ndDose
|
1stDose
|
2nd Dose
|
1stDose
|
1stDose
|
1stDose
|
2ndDose
|
55,088
|
1,50,779
|
1,44,161
|
1,47,450
|
1,31,717
|
7,29,978
|
10,60,944
|
2,98,229
|
महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यात दैनंदिन कोविड रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.
गेल्या 24 तासात 17,921 नव्या रुग्णांची नोंद झाली
यापैकी 83.76% रुग्ण या सहा राज्यांमधले आहेत.
महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 9,927 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर केरळ 2,316,तर पंजाबमध्ये 1,027 नव्या रुग्णांची नोंद झाली.
नव्या रुग्ण संख्येत आठ राज्यांचा आलेख चढता आहे.
भारतातली एकूण सक्रीय रुग्ण संख्या आज 1.84 लाख (1,84,598) आहे.
खालील आलेख 17 जानेवारी 2021 ते 10 मार्च 2021 या काळातला सक्रीय रुग्ण संख्येतला दैनंदिन बदल दर्शवतो.
दर दिवशी कोविड चाचण्यांच्या संख्येचा चढता आलेख आहे. भारतात एकूण 22 कोटीपेक्षा जास्त (22,34,79,877) चाचण्या झाल्या आहेत.
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.43%. आहे.
गेल्या 24 तासात 133 मृत्यू झाले.
यापैकी 77.44% मृत्यू पाच राज्यातले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त 56 मृत्यू झाले तर पंजाब मध्ये 20 आणि केरळमध्ये 16 मृत्यूंची नोंद झाली.
19 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात कोविड-19 च्या एकाही रुग्णांची नोंद नाही.
राजस्थान, आंध्र प्रदेश, चंदीगड, ओदिशा, उत्तराखंड, झारखंड, बिहार, पुडुचेरी, लक्षद्वीप, सिक्किम, लडाख (केंद्र शासित प्रदेश ), मणिपूर, मेघालय, नागालँड, दमण दीव आणि दादरा नगर हवेली, त्रिपुरा, मिझोरम, अंदमान निकोबार आणि अरुणाचल प्रदेश यांचा यात समावेश आहे.
Jaydevi PS/N.Chitale/P.Kor
Follow us on social media: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1703777)
Visitor Counter : 231