पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 5 मार्च रोजी केंब्रिज एनर्जी रिसर्च असोसिएट्स विकच्या जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्काराचा स्वीकार करतील आणि केंब्रिज एनर्जी रिसर्च असोसिएट्स वीक (CERAWeek) 2021 मध्ये बीजभाषण करतील

Posted On: 04 MAR 2021 7:30PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंब्रिज एनर्जी रिसर्च असोसिएट्स वीक (CERAWeek) 2021 मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सेरावीक ग्लोबल एनर्जी अँड एन्व्हायर्नमेन्ट लीडरशिप अवॉर्ड अर्थात जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्काराचा स्वीकार करतील आणि बीजभाषण करतील.

 

CERAWeek विषयी-

डॉ. डॅनियल यर्गिन यांनी 1983 मध्ये CERAWeek ची स्थापना केली होती. 1983 पासून ह्युस्टन येथे दरवर्षी मार्चमध्ये याचे आयोजन केले जाते आणि हा जगातील सर्वात महत्त्वाचा वार्षिक ऊर्जा मंच मानला जातो. 1 मार्च ते 5 मार्च 2021 या कालावधीत CERAWeek 2021 आयोजित केले जात आहे.

 

पुरस्काराविषयी-

CERAWeek ग्लोबल एनर्जी आणि एन्व्हायर्नमेन्ट लीडरशिप पुरस्कार देण्याची सुरुवात 2016 मध्ये झाली. जागतिक ऊर्जा आणि पर्यावरणाच्या भविष्याचे नेतृत्व आणि ऊर्जेची उपलब्धता, परवडणारी ऊर्जा आणि पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी उपाय आणि धोरणे प्रदान करण्यासंबंधीची वचनबद्धता यातून प्रकट होते.

***

S.Tupe/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1702531) Visitor Counter : 214