आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य सचिव आणि लस प्राधिकरण (को-विन) अधिकार प्राप्त समूहाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली वयोगटानुसार लसीकरणाबाबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत बैठक


राज्य/केंद्रशासित प्रदेशांना को- विन 2.0 ची मूलभूत वैशिष्ट्ये केली स्पष्ट

Posted On: 26 FEB 2021 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2021

 

केंद्रीय आरोग्य सचिव श्री. राजेश भूषण यांच्यासह लस प्राधिकरण (को- विन) अधिकार प्राप्त  समूहाचे अध्यक्ष आणि कोविड -19 लस प्राधिकरण राष्ट्रीय निर्यात समूहाचे सदस्य (एन ई जी व्ही ए सी) डॉ.आर .एस.शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे (एनएचएम) व्यवस्थापकीय संचालक यांची आज दूरदृष्य प्रणालीच्या  माध्यमातून वयोगटानुसार लसीकरण  करण्याबाबत उच्चस्तरीय बैठक झाली.

16जानेवारी ,2021 रोजी  देशव्यापी कोविड- 19 लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला, आता 1 मार्च 2021 पासून या लसीकरण मोहिमेचा विस्तार वयोगटानुसार वाढविला जाईल.

  1. 60 वर्षावरील वयाचे सर्व नागरिक

    आणि

  1. 45 ते 59 वर्षे वयोगतील विशिष्ट सहव्याधी असलेल्या व्यक्ती

नागरिक केंद्रित दृष्टिकोणानुसार, या टप्प्यातील मूलभूत बदल असा की, नागरिकांना त्यांच्या पसंतीची लसीकरण केंद्रे निवडता येतील. दुसरे, खाजगी क्षेत्रातील रुग्णालये कोविड लसीकरण केंद्र म्हणून समाविष्ट होतील.

सर्व कोविड लसीकरण केंद्रांमध्ये ( सीव्हीसी) खालील आरोग्य सुविधा असणे आवश्यक आहे.  

  • सरकारी आरोग्य सुविधा जसे की,एसएचसी, पीएचसी, सीएचसी, आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्रे, उपविभागीय रुग्णालये, जिल्हा रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालये.
  • केंद्र सरकार आरोग्य योजना (सीजीएचएस), आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एबी-पीएम जेएवाय) आणि तत्सम राज्य आरोग्य विमा योजनां अंतर्गत सर्व खाजगी रुग्णालये सुचिबद्ध असावीत.

कोविड लसीकरण केंद्र म्हणून वापर करताना खाजगी  आरोग्य केंद्रांमध्ये खालील सुविधा अनिवार्य असणे सुनिश्चित करण्याबाबत  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितले आहे:

i. मंत्रालयाने जारी केलेल्या सर्वसमावेशक तपशीलवार विशेष कार्यप्रणालीनुसार लसीकरण प्रक्रियेसाठी पुरेशी जागा

ii. लसीच्या कुप्या साठवण्यासाठी मूलभूत शीतसाखळी उपकरणे

iii. लसीकरण करणारे आणि कर्मचाऱ्यांची स्वतःची पथके

iv. लसीकरणानंतर प्रतिकूल परिणाम जाणवणाऱ्या (एइएफआय)  प्रकरणांच्या व्यवस्थापनासाठी पुरेशी व्यवस्था

विना पर्वा प्रवेशासाठी सर्व लाभार्थ्यांना, खालीलपैकी कोणतेही छायाचित्र असलेले ओळखपत्र कागदपत्रे म्हणून घेऊन जाण्याचा सल्ला देणे :

  • आधार कार्ड
  • निवडणूक मतदार ओळखपत्र
  • ऑनलाईन नोंदणीच्याबाबतीत नोंदणी करताना दिलेले विशिष्ट ओळखपत्र ( जर आधार आणि निवडणूक मतदार ओळखपत्र नसल्यास)
  • 45 वर्षे ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी सहव्याधी प्रमाणपत्र ( नोंदणीकृत डॉक्टरांची स्वाक्षरी असलेले)
  • आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रोजगार प्रमाणपत्र / अधिकृत ओळखपत्र - (एकतर छायाचित्र आणि जन्मतारखेसह)

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी नोंदणी प्रक्रिया तीन मार्गांनी करावी:

i. आगाऊ स्व - नोंदणी :

    लाभार्थी को - विन 2.0 पोर्टल आणि आरोग्य सेतू आदीं सारखी  माहिती तंत्रज्ञान एप डाउनलोड करून आगाऊ नोंदणी करू शकतील. लाभार्थ्यांना त्याच्या / तिच्या  पसंतीची कोविड लसीकरण केंद्रे ( सीव्हीसी) निवडून लसीकरणासाठी निश्चित वेळ घेता येईल.

ii.स्थळावर नोंदणी :

    ज्यांनी आगाऊ स्व- नोंदणी केलेली नाही त्यांनी  लसीकरण केंद्रामध्ये जाऊन नोंदणी करावी आणि त्यानंतर लसीकरण करून घ्यावे.

iii. सुलभ समूह नोंदणी:

     या यंत्रणेअंतर्गत, राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सरकारांनी सक्रिय पुढाकार घ्यावा. कोविड लसीकरणासाठी, संभाव्य लाभार्थ्यांच्या निश्चित गटाच्या लसीकरण्यासाठी तारखा ठरविण्याचा निर्णय घेतला जाईल. आशा कर्मचारी , सहाय्यक परिचारिका , पंचायतराज प्रतिनिधी आणि महिला स्वयं सहाय्यता गट यांचा उपयोग निश्चित समूह तयार करण्यासाठी केला जाईल.

वरील तीन मार्गांअंतर्गत,सर्व लाभार्थी  को- विन 2.0 व्यासपीठावर संकलित केले जातील आणि डिजिटल क्यूआर कोड  आधारित तात्पुरते  प्रमाणपत्र (पहिली मात्रा घेतल्यानंतर) आणि अंतिम प्रमाणपत्र (दुसरी मात्रा घेतल्यानंतर) दिले जाईल.लस घेतल्यानंतर लाभार्थ्यांना प्राप्त झालेल्या एसएमएसमध्ये दर्शविलेल्या दुव्यावरून हे प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल. सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण विनामूल्य असेल. नियुक्त केलेल्या कोणत्याही / सुचिबद्ध खाजगी आरोग्य सुविधा केंद्रात कोविड लस घेणाऱ्यांना पूर्व – निर्धारित  शुल्क भरावे लागेल.

 

Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701189) Visitor Counter : 399