आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

को-विन 1.0 ते को-विन 2.0 या माहिती तंत्रज्ञान कार्यपद्धतीतील बदलाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी (27 आणि 28 फेब्रुवारी 2021) कोविड 19 लसीकरणाच्या सत्राचे आयोजन नाही

Posted On: 26 FEB 2021 1:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2021

कोविड लसीकरणाला 16 जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ झाला होता. देशभरात सुरू झालेली ही लसीकरणाची मोहीम 1 मार्च  2021  60 वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणासह वेगाने विस्तारत आहे.

येत्या शनिवारी आणि रविवारी (27 आणि 28 फेब्रुवारी) को-विन या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये को-विन 1.0 ते को-विन 2.0 असा बदल करण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेऊन, लसीकरणाचे सत्र या दोन दिवसांदरम्यान आयोजित केले जाणार नाही. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या बदलाबाबतची कल्पना आगोदरच देण्यात आली आहे.

 

S.Thakur/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701027) Visitor Counter : 232