पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान ‘परिक्षा पे चर्चा 2021’दरम्यान विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार
प्रविष्टि तिथि:
18 FEB 2021 4:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2021
पंतप्रधान, नरेंद्र मोदी ‘परिक्षा पे चर्चा 2021’ दरम्यान जगभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी ऑनलाईन संवाद साधतील.
ट्वीटच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले, “आमचे शूर ExamWarriors” जोमाने परीक्षेची तयारी असतानाच ‘परिक्षा पे चर्चा 2021’ संवाद मालिका पुन्हा त्यांच्या भेटीला आली आहे, यावेळी हा संवाद संपूर्णपणे ऑनलाईन असून जगभरातील विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. चला, हसतमुख चेहऱ्याने आणि कोणताही ताण न घेता परीक्षा देऊया! #PPC2021
लोकांच्या मागणीनुसार, ‘परीक्षा पे चर्चा 2021’ मध्ये पालक आणि शिक्षक देखील सहभागी होऊ शकतात. गंभीर विषयांवर मजेदार चर्चा असेल. मी माझ्या विद्यार्थी मित्रांना, त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना #PPC2021 मध्ये मोठ्या संख्येने भाग घेण्याचे आवाहन करतो. "
शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमवेत पंतप्रधानांच्या संवाद कार्यक्रमाचे पहिले सत्र "परीक्षा पे चर्चा 1.0” 16 फेब्रुवारी, 2018 रोजी नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते. 29 जानेवारी, 2018 रोजी "परीक्षे पे चर्चा 2.0” हा शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह संवाद कार्यक्रमाचे दुसरे सत्र देखील नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते. “परीक्षा पे चर्चा 2020” हे तिसरे सत्र नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर 20 जानेवारी 2020 आयोजित करण्यात आले होते.
M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1699061)
आगंतुक पटल : 216
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Telugu
,
Bengali
,
Assamese
,
Odia
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Malayalam