पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्यात दूरध्वनीवरून संवाद
प्रविष्टि तिथि:
17 FEB 2021 10:24PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक, यांच्याशी दूरध्वनी वरून संवाद साधला.
भारताकडून ओमानला पुरविल्या जाणाऱ्या कोविड-19 लसीसाठी सुलतान यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उभय नेत्यांनी साथीच्या आजाराविरुद्ध सुरु असलेल्या संयुक्त लढाईत एकमेकाला सहकार्य करण्याबाबत सहमती दर्शविली.
सुलतान यांच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि ओमानसाठी त्यांनी निश्चित केलेल्या व्हिजन 2040 साठी पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले.
संरक्षण, आरोग्य, व्यापार आणि गुंतवणूकीसह सर्व क्षेत्रात भारत-ओमानच्या वाढत्या सहकार्याबद्दल उभय नेत्यांनी समाधान व्यक्त केले.
दोन्ही धोरणात्मक भागीदारांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी अनिवासी भारतीयांच्या भूमिकेचे उभय नेत्यांनी कौतुक केले.
***
M.Chopade/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1698887)
आगंतुक पटल : 135
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam