PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 17 FEB 2021 6:37PM by PIB Mumbai

 

दिल्ली-मुंबई, 17 फेब्रुवारी 2021

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

 

Image

 

Image

Image

Image

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नई येथे मुख्य प्रकल्पांचा पायाभरणी आणि उद्घाटन समारंभ पार पडला आणि त्यांच्या हस्ते लष्कराला अर्जुन मेन बॅटल टँक (एम के – 1 ए) सुपूर्त करण्यात आला. या समारंभ प्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले, ``हे प्रकल्प म्हणजे नाविन्य आणि स्वदेशी विकासाचे प्रतीक आहेत. पुढे जाऊन हे प्रकल्प तामिळनाडूचा विकास ठरणार आहेत. `` ते म्हणाले, आज पायाभरणी करण्यात आलेल्या अत्याधुनिक अशा 636 किलोमीटर लांबीच्या प्रचंड मोठ्या अनीकट कालवा पद्धतीमुळे तंजावूर आणि पुदुक्कोट्टी यांना विशेष लाभ होणार आहे. याचा परिणाम खूप मोठा होणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करताना, देशासाठी बहुमोल योगदान दिलेल्या थोर नेत्यांचे स्मरण अतिशय महत्वाचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारत आणि भारतीयत्व यासाठी सर्वस्वाचे बलिदान देणाऱ्यांना, इतिहासाच्या पुस्तकात योग्य ते महत्व दिले गेले नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. भारताचा इतिहास घडवणाऱ्याप्रती, इतिहास लेखकांची ही अनियमितता आणि अन्याय आता दूर करण्यात येत आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आपण प्रवेश करत असून या टप्यावर या महान व्यक्तीत्वांच्या योगदानाचे स्मरण अधिकच महत्वाचे ठरत असल्याचे ते म्हणाले. उत्तर प्रदेशातल्या बहराइच इथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

भारत सरकारतर्फे विविध क्षेत्रात पुरविल्या जाणाऱ्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) सारख्या वैशिष्ट्यपूर्ण प्रोत्साहनानुसार मंत्रिमंडळाने आज दूरसंचार व नेटवर्किंग उत्पादनांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजना लागू करायला  मान्यता दिली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बालकांचे सर्वोत्तम हित सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने बाल संरक्षण उपक्रमांना बळकटी प्रदान करण्यासाठी लागू करण्यात येणाऱ्या उपाययोजना सुरू करण्यासाठी बाल न्याय (मुलांचे संरक्षण आणि संरक्षण) कायदा, 2015 मध्ये सुधारणा करण्याच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

भारतातील उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या आजमितीला 1.36 लाख (1,36,549) इतकी आहे. भारतातील कोरोनारुग्णांच्या एकूण संख्येच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 1.25% इतके आहे. एक महत्त्वाची घडामोड अशी की, सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांत उपचाराधीन रुग्णांची संख्या गेल्या महिन्यात घटली आहे. महाराष्ट्रातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. 17 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्रात 53,163  कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते, तर 17 फेब्रुवारी 2021 ला हीच संख्या 38,307 इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासांत अठरा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत कोविड -19 मुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही. त्यांची नावे पुढीलप्रमाणे-  उत्तरप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, जम्मू आणि काश्मीर (केंद्रशासित प्रदेश), झारखंड, पुदुचेरी, हिमाचल प्रदेश, लक्षद्वीप, मणिपूर, लडाख(केंद्रशासित प्रदेश), आसाम, अंदमान आणि निकोबार बेटे, सिक्कीम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि दमण-दीव आणि दादर-नगरहवेली. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे भारतातील दैनंदिन प्रमाण सातत्याने वाढत आहे. कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या आज 1.06 कोटी (1,06,44,858) इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.33% इतका आहे. गेल्या चोवीस तासांत 11,833 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनामुक्तीचे वाढते प्रमाण आणि नव्या रुग्णसंख्येतील घट यामुळे सक्रिय / उपचाराधीन रुग्णसंख्या कमी होत चालली आहे. गेल्या चोवीस तासांत 11,610 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

17 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 8:00 वाजेपर्यंत देशातील एकूण सुमारे नव्वद लाख आरोग्य कर्मचारी आणि कोरोनायोद्ध्यांना कोविड-19 प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आज सकाळी आठ वाजताच्या तात्कालिक अहवालानुसार 1,91,373 सत्रांद्वारे लाभार्थ्यांना कोरोना लसीचे 89,99,230 डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 61,50,922 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा), 2,76,377 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा) आणि 25,71,931 आघाडीवरील कर्मचारी (पहिली मात्रा) यांचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

इतर अपडेट्स:

कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत या संदर्भात जनजागृती करण्यासाठीच्या बहुमाध्यमी प्रदर्शनकारी व्हॅनला महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप कुमार व्यास यांनी हिरवा झेंडा दाखवला. मुंबई येथील फिल्म्स डिव्हीजनच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला फिल्म्स डिव्हिजनच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा व जागतिक आरोग्य संघटनेचे मुंबईतील सर्वेक्षण आरोग्य अधिकारी विवेक आर परदेशी उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

कोविड लसीकरणाबाबत जागरूकता, त्याची कार्यक्षमता, सुरक्षा आणि लसीकरण (एईएफआय) आणि त्यानंतरच्या प्रतिकूल घटनांविषयी भीती  दूर करण्यासाठी  माहिती आणि  प्रसारण मंत्रालयाचा गोवा येथील लोक संपर्क विभाग (फील्ड आउटरीच ब्यूरो) महिनाभर चालणारी एक मोहीम सुरू करणार आहे. कोविड लसीकरण योजना आणि कोविड प्रतिबंधक योग्य वर्तनाशी संबंधित माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे , लसीकरणाबाबत चुकीची माहिती आणि  अफवा रोखणे हा या व्यापक जनजागृती मोहिमेचा  उद्देश आहे. आत्मविश्वास वाढवणे आणि लसीकरणाच्या सर्व पैलूंबाबत संभ्रम दूर करण्यासाठी ही मोहीम सज्ज आहे.  या मोहिमेमध्ये आत्मनिर्भर भारत या  घटकाचाही समावेश आहे, ज्याद्वारे फील्ड आउटरीच ब्यूरो, गोवा हे गोव्यातील जनतेला केंद्र सरकारच्या विविध योजना, सरकारची भविष्यातील धोरणे याबाबत माहिती देण्याची योजना आखत आहे,  ज्यामध्ये कौशल्य विकास, उद्योजकता, व्होकल फॉर लोकलचे महत्व इत्यादींचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

कोविड-19 महामारीच्या कालखंडात निवृतीवेतनधारकांना मदत म्हणून सरकारकडून अनेक पावले उचलली गेली आहेत असे प्रतिपादन केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, अणुउर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) जितेन्द्र सिंग यांनी केले. निवृतीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने, कोविड-19 महामारीसाठी लावलेल्या टाळेबंदी दरम्यान निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन वेळेवर जमा व्हावे तसेच त्यांचे निवृत्तीपश्चात लाभ त्यांना वेळेवर मिळावेत, जेणेकरून या महामारीमध्ये ते आरोग्यसंपन्न व सजग रहावेत म्हणून अनेक प्रकारे पुढाकार घेतला, अशी माहिती राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात जितेंद्र सिंग यांनी दिली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

कोविडचे संक्रमण आणि  जागतिक आरोग्य संघटनेने कोविडला जागतिक महामारी म्हणून जाहीर केल्याचे लक्षात घेत, केंद्र सरकारने विशेष एकरकमी निधी वितरणाच्या माध्यमातून कोविडला अधिसूचित आपत्ती म्हणून ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून वर्ष 2019-20 आणि  2020-21मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये त्यासाठी मदत देता येईल. त्यानुसार, केंद्र सरकारने , सर्व राज्यांमधील SDRMF निधीसाठी 3 एप्रिल 2020 रोजी 11,092.00 पहिला हप्ता जारी केला. त्यानंतर 17 राज्यांना 7866.00 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता जारी करण्यात आला. त्यापुढे, 2020-21 या वर्षात दिलेल्या निधीपैकी 50 टक्के निधी कोविड व्यवस्थापनासाठी खर्च करण्याची परवानगी मिळाली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्यसभेत एका लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

कोविड लसीकरण मोहीम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाचा गोव्यात, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ झाला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील क्षेत्रीय  लोकसंपर्क विभाग, गोवा यांच्या वतीने  ही मोहीम सुरु केली आहे.

 

महाराष्ट्र अपडेट्स

मंगळवारी महाराष्ट्रात कोविड -19 चे 3,663 नवीन रुग्ण आढळून आले आणि बाधित लोकांची संख्या 20,71,306 वर गेली. जानेवारी अखेरपर्यंत राज्यातील कोविड -19 रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत होती मात्र गेल्या सलग   7 दिवसांपासून रुग्णांची संख्या 3 हजारांपेक्षा जास्त नोंदवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शहरात पुन्हा लॉक डाऊन होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे. कोविड -19 च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्या लोकांच्या निष्काळजीपणाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोविड -19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

FACT CHECK

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Image

Image

S.Tupe/P.Kor



(Release ID: 1698789) Visitor Counter : 204


Read this release in: English , Hindi , Manipuri , Gujarati