माहिती आणि प्रसारण मंत्रालय

कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत याविषयीची  एक महिना कालावधीची प्रचार मोहीम राबवण्यासाठी फील्ड आउटरीच ब्यूरो गोवा सज्ज


मोबाइल व्हॅन च्या माध्यमातून सामान्य सेवा केंद्रांच्या  (सीएससी) ई-सेवा पुरवणार

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत शुक्रवारी अल्तीन्हो इथून कार्यक्रमाचा शुभारंभ करणार

Posted On: 11 FEB 2021 3:59PM by PIB Mumbai

 

कोविड लसीकरणाबाबत जागरूकता, त्याची कार्यक्षमता, सुरक्षा आणि लसीकरण (एईएफआय) आणि त्यानंतरच्या प्रतिकूल घटनांविषयी भीती  दूर करण्यासाठी  माहिती आणि  प्रसारण मंत्रालयाचा गोवा येथील लोक संपर्क विभाग (फील्ड आउटरीच ब्यूरो) महिनाभर चालणारी एक मोहीम सुरू करणार आहे. .

कोविड लसीकरण योजना आणि कोविड प्रतिबंधक योग्य वर्तनाशी संबंधित माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे , लसीकरणाबाबत चुकीची माहिती आणि  अफवा रोखणे हा या व्यापक जनजागृती मोहिमेचा  उद्देश आहे. आत्मविश्वास वाढवणे आणि लसीकरणाच्या सर्व पैलूंबाबत संभ्रम दूर करण्यासाठी ही मोहीम सज्ज आहे.  या मोहिमेमध्ये आत्मनिर्भर भारत या घ घटकाचाही समावेश आहे, ज्याद्वारे फील्ड आउटरीच ब्यूरो गोवा हे गोव्यातील जनतेला केंद्र सरकारच्या विविध योजना, सरकारची भविष्यातील धोरणे याबाबत माहिती देण्याची योजना आखत आहेज्यामध्ये कौशल्य विकास, उद्योजकता, व्होकल फॉर लोकलचे महत्व इत्यादींचा समावेश आहे.

मोबाइल प्रदर्शन व्हॅन यांचा वापर करून  ही मोहीम राबवली जाणार आहे.  अत्याधुनिक मल्टीमीडिया प्रदर्शन व्हॅन उत्तर आणि  दक्षिण गोव्यात फिरेल.  प्रत्येक व्हॅन दररोज  30-40 किलोमीटरचा प्रवास करेल आणि  जिल्ह्यातील 8-10 गावांना भेट देईल.  कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत याविषयी स्थानिक लोकसंगीत  आणि  मनोरंजनाद्वारे  जनजागृती करण्यासाठी शहरे / खेड्यांमध्ये खासगी नोंदणीकृतगटांचे   5-6 सदस्यांचे पथक  सांस्कृतिक कार्यक्रम सादर करेल.  प्रवासाच्या  मार्गावरील लोकांचे लक्ष वेधण्यासाठी व्हॅनमध्ये मोठ्या एलईडी स्क्रीन देखील असतील ज्यावर या विषयांचे  संदेश असतील. सर्व कार्यक्रम डिजिटल डॅशबोर्डवर लाईव्ह  ट्रॅक केले जातील. त्यामध्ये सर्व कार्यक्रमांची रोजची छायाचित्रे, व्हिडिओ, वृत्त वाहनाचे तपशील वगैरे असतील. टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबवली जाईल. पहिल्या टप्प्यात ही व्हॅन उत्तर गोव्यातील शहरे आणि खेड्यांना 10 दिवस भेट देईल आणि दक्षिण गोव्यात पुढचे 10 दिवस भेट देईल. यात आणखी दोन टप्पे असतील. प्रत्येक गावात कलाकार कला सादर करतील.

ही प्रचार मोहीम 12 फेब्रुवारी, 2021 रोजी सुरू होणार आहे आणि पूर्ण महिना  सुरू राहील. अल्टिनो इथल्या अभिलेखागार आणि पुरातत्व महासंचालनालय कार्यालयासमोरील जॉगर्स पार्कच्या  पार्किंग परिसरात या मोहिमेला  गोव्याचे मुख्यमंत्री  प्रमोद सावंत  हिरवा झेंडा दाखवतील.  गोव्याच्या  माहिती तंत्रज्ञान मंत्री जेनिफर मॉन्सॅरेट आणि   गोवा  राज्य सरकार व भारत सरकारचे अन्य वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमाला उपिस्थत राहतील. .

मोहिमेचा एक भाग म्हणूनगोवा लोकसंपर्क विभागगोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने राज्यातील सामान्य सेवा केंद्रे (सीएससी) च्या कार्यप्रणालीविषयी जनजागृती करणार आहे. नागरिकांना मल्टीमीडिया प्रदर्शन व्हॅनद्वारे सीएससीच्या सेवा उपलब्ध होऊ शकतील आणि आपल्या  शंकांचे निरसनही ते करू शकतील.

लोकसंपर्क विभाग, गोवा  ही भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या  क्षेत्रीय लोकसंपर्क विभाग (महाराष्ट्र आणि गोवा ) अंतर्गत कार्यरत एकक आहे. या मोहिमेत क्षेत्रीय लोकसंपर्क विभागाने (महाराष्ट्र आणि गोवा )गोव्यातील  2 जिल्ह्यांसाठी आणि महाराष्ट्रातील  36 जिल्ह्यांसाठी एकूण  16 फिरत्या  मल्टिमीडिया प्रदर्शन व्हॅन तैनात केल्या आहेत.

लोकसंपर्क विभाग, स्थानिक लोककला  आणि  पारंपारिक कलाप्रकारांच्या माध्यमातून, प्रत्यक्ष संवादावर भर देत  सरकारची  धोरणे, कार्यक्रम आणि योजनांचा अधिकाधिक प्रसार करतो. जागरूकताआपुलकी आणि आपलेपणाची भावना निर्माण करणे आणि  अशा कार्यक्रम/योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी, लोकांना माहितीच्या माध्यमातून सक्षम करणे, हे विभागाचे मुख्य कार्य आहे.  सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी आणि नागरिकांना विकासासाठी सक्रिय करण्याकरिता कार्यक्रमांचे आयोजन विभाग करतो. विशेष संपर्क कार्यक्रमांचे आयोजन  राज्य सरकार, स्थानिक संस्था, गट  कार्यकर्ते, इत्यादी भागधारकांच्या साहाय्याने केले जाते. ते  स्थानिक भाषेत आणि जवळच्या ठिकाणी असल्याने या संवाद कार्यक्रमांचा परिणाम जास्त होतो आणि यामुळे सरकारच्या योजना लोकांना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते.  या उपक्रमांमध्ये  पारंपारिक आणि लोक माध्यमांचा वापर करून पारंपरिक आणि आधुनिक  पद्धतींची  सांगड घातली जाते.

कोविड 19 साथीमुळे निर्माण  झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी 12 मे 2020 रोजी 20 लाख कोटी रुपयांचे भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 10% समतुल्य,विशेष आर्थिक व सर्वसमावेशक पॅकेज जाहीर केले. त्याद्वारे  त्यांनी आत्मानिर्भर भारत म्हणजेच स्वयंपूर्ण भारताचा नारा दिला.  अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, यंत्रणा, लोकसांख्यिकी ताकद  आणि मागणी  या  आत्मानिर्भर भारताच्या  पाच आधारस्तंभांची रूपरेषा देखील त्यांनी सांगितली. सरकारने जान भी, जहां भीयावर आधारित एक समग्र रणनीती अवलंबली आहे. आपल्या सामर्थ्यावरं विश्वास असलेला स्वयंपूर्ण भारत निर्माण करणे हे आत्मनिर्भर भारत अभियानाचे उद्दिष्ट आहे.

***

Jaydevi PS/S.Kane/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1697104) Visitor Counter : 129


Read this release in: English