कृषी मंत्रालय
पूर आणि कोविड महामारीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत
Posted On:
12 FEB 2021 10:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2021
राज्य सरकारे विविध नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्यांना दिलासा देण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी मधून आर्थिक आणि इतर मदत करत असतात. यासाठी केंद्र सरकारद्वारे मंजूर वस्तू आणि नियमांनुसार राज्यांना हा निधी देण्यात आला आहे. तसेच निश्चित प्रक्रियेनुसार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून अतिरिक्त मदतही देण्यात आली आहे.
कोविडचे संक्रमण आणि जागतिक आरोग्य संघटनेने कोविडला जागतिक महामारी म्हणून जाहीर केल्याचे लक्षात घेत, केंद्र सरकारने विशेष एकरकमी निधी वितरणाच्या माध्यमातून कोविडला अधिसूचित आपत्ती म्हणून ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून वर्ष 2019-20 आणि 2020-21मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये त्यासाठी मदत देता येईल. त्यानुसार, केंद्र सरकारने , सर्व राज्यांमधील SDRMF निधीसाठी 3 एप्रिल 2020 रोजी 11,092.00 पहिला हप्ता जारी केला. त्यानंतर 17 राज्यांना 7866.00 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता जारी करण्यात आला. त्यापुढे, 2020-21 या वर्षात दिलेल्या निधीपैकी 50 टक्के निधी कोविड व्यवस्थापनासाठी खर्च करण्याची परवानगी मिळाली आहे.
कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व कामे सुरळीत चालू ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या गेल्या. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक योजना /कार्यक्रमही या काळात सुरु करण्यात आले.
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज राज्यसभेत एका लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.
S.Tupe/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1697603)
Visitor Counter : 185