कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
कोविड-19 महामारीच्या काळात निवृतीवेतनधारकांना मदत म्हणून सरकारने पावले उचलली
Posted On:
11 FEB 2021 8:12PM by PIB Mumbai
कोविड-19 महामारीच्या कालखंडात निवृतीवेतनधारकांना मदत म्हणून सरकारकडून अनेक पावले उचलली गेली आहेत असे प्रतिपादन केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, अणुउर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) जितेन्द्र सिंग यांनी केले.
निवृतीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने, कोविड-19 महामारीसाठी लावलेल्या टाळेबंदी दरम्यान निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन वेळेवर जमा व्हावे तसेच त्यांचे निवृत्तीपश्चात लाभ त्यांना वेळेवर मिळावेत, जेणेकरून या महामारीमध्ये ते आरोग्यसंपन्न व सजग रहावेत म्हणून अनेक प्रकारे पुढाकार घेतला, अशी माहिती राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात जितेंद्र सिंग यांनी दिली.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर वयोवृद्ध व्यक्तींच्या मदतीसाठी जीवित प्रमाणपत्र देण्याची मुदत शिथिल करण्यात आली असेही मंत्र्यांनी नमूद केले.
भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या मदतीने विभागाने तसेच टपालवाटप कर्मचारी व ग्रामीण डाक सेवक यांच्या मदतीने निवृत्तीवेतनधारकांसाठी घरोघरी जिविप्रमाणपत्र डिजिटली सादर करण्यास मदत केली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
***
S.Tupe/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1697203)
Visitor Counter : 206