आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
सातत्याने घट होत भारताची उपचाराधीन रुग्णांची संख्या 1.41 लाखांपर्यंत खाली आली
33 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात 5,000 पेक्षा कमी उपचाराधीन रुग्ण
9 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत एकही मृत्यू नाही
66 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना कोविड 19 प्रतिबंधक लस देण्यात आली
Posted On:
10 FEB 2021 1:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2021
भारतात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या आज 1.41 लाख (1,41,511) पर्यंत घसरली आहे. सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या देशातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या केवळ 1.30 टक्के आहे.
गेल्या 24 तासांत 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 5000 पेक्षा कमी उपचाराधीन रुग्णांची नोंद झाली आहे. दमण आणि दीव व दादरा आणि नगर हवेलीमध्ये सध्या एकही सक्रिय रुग्ण नाही.

गेल्या 24 तासांत 11,067 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 13,087 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे एकूण सक्रिय रुग्णसंख्येत 2,114 इतकी निव्वळ घट झाली आहे.
देशातील एकूण सक्रिय रुग्णसंख्येपैकी 71 टक्के रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रात आहेत.

एकोणीस राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. ही राज्ये आहेत- उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, ओदिशा , आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर (केंद्रशासित प्रदेश ), झारखंड, पुदुचेरी, मणिपूर, नागालँड, लक्षद्वीप, मेघालय, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार बेटे, लडाख (केंद्रशासित प्रदेश ), मिझोरम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि दमण आणि दीव अन दादरा आणि नगर हवेली.
देशात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 1,05,61,608 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.27 टक्के आहे
10 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 8:00 वाजेपर्यंत, 66 लाख (66,11,561) लाभार्थ्यांना देशव्यापी कोविड 19 लसीकरण अंतर्गत लस देण्यात आली आहे.
S. No.
|
State/UT
|
Beneficiaries vaccinated
|
1
|
A & N Islands
|
3,413
|
2
|
Andhra Pradesh
|
3,25,538
|
3
|
Arunachal Pradesh
|
13,480
|
4
|
Assam
|
1,08,887
|
5
|
Bihar
|
4,15,989
|
6
|
Chandigarh
|
6,458
|
7
|
Chhattisgarh
|
1,98,567
|
8
|
Dadra & Nagar Haveli
|
1,697
|
9
|
Daman & Diu
|
843
|
10
|
Delhi
|
1,32,046
|
11
|
Goa
|
8,929
|
12
|
Gujarat
|
5,72,412
|
13
|
Haryana
|
1,80,663
|
14
|
Himachal Pradesh
|
61,271
|
15
|
Jammu & Kashmir
|
74,219
|
16
|
Jharkhand
|
1,43,401
|
17
|
Karnataka
|
4,41,692
|
18
|
Kerala
|
3,22,016
|
19
|
Ladakh
|
2,309
|
20
|
Lakshadweep
|
920
|
21
|
Madhya Pradesh
|
3,80,285
|
22
|
Maharashtra
|
5,36,436
|
23
|
Manipur
|
11,078
|
24
|
Meghalaya
|
9,069
|
25
|
Mizoram
|
11,046
|
26
|
Nagaland
|
5,826
|
27
|
Odisha
|
3,42,254
|
28
|
Puducherry
|
4,301
|
29
|
Punjab
|
87,181
|
30
|
Rajasthan
|
4,91,543
|
31
|
Sikkim
|
6,961
|
32
|
Tamil Nadu
|
1,85,577
|
33
|
Telangana
|
2,43,665
|
34
|
Tripura
|
51,449
|
35
|
Uttar Pradesh
|
6,73,542
|
36
|
Uttarakhand
|
85,359
|
37
|
West Bengal
|
4,04,001
|
38
|
Miscellaneous
|
67,238
|
Total
|
66,11,561
|
यापैकी 5,482,102 आरोग्य कर्मचारी आहेत तर 10,01,427 आघाडीवरचे कामगार आहेत. आतापर्यंत लसीकरणाची 1,34,746 सत्रे घेण्यात आली आहेत
देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या 25 व्या दिवशी (9फेब्रुवारी 2021) 7,990 सत्रांमध्ये 3,52,553 लोकांचे (एचसीडब्ल्यू - 1,28,032 आणि एफएलडब्ल्यू- 2,24,521) लसीकरण करण्यात आले.
दररोज लसीकरण करण्यात येत असलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. .

काल बरे झालेल्या रुग्णांपैकी 81.68 टक्के रुग्ण 6 राज्यात आहेत.
केरळमध्ये काल एका दिवसात 6,475 इतके सर्वाधिक रुग्ण बरे झाले गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 2,554 रुग्ण बरे झाले आणि त्याखालोखाल कर्नाटकमध्ये 513 रुग्ण बरे झाले.

काल आढळललेया नवीन रुग्णांपैकी 83.31टक्के रुग्ण 6 राज्यातील आहेत.
केरळमध्ये काल 5,214 इतक्या सर्वाधिक संख्येने नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल महाराष्ट्रात 2,515, तर तामिळनाडूमध्ये 469 नवीन रुग्ण आढळले आहेत.

गेल्या 24 तासांत 94 मृत्यूची नोंद झाली आहे.
नवीन मृत्यूंपैकी 80.85 टक्के मृत्यू सहा राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 35 मृत्यू झाले, केरळमध्ये 19 मृत्यू तर पंजाबमध्ये 8 मृत्यूची नोंद झाली आहे.

* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1696717)
Visitor Counter : 186
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam